Google I/O 2025 चे धमाकेदार AI फीचर्स आता भारतात लॉन्च! AI तंत्रज्ञानाचे नवे युग Google AI Mode India

Updated On:

Google AI Mode India 2025: Google ने आपले नवीन व सर्वात शक्तिशाली AI सर्च इंजिन म्हणजे “AI Mode” आता भारतात देखील सुरू केलं आहे. यामध्ये महत्वाच्या फीचरची घोषणा Google I/O 2025 च्या माध्यमातून करण्यात आली आहे, आणि आता Google Labs माध्यमातून इंग्रजी भाषेत भारतात उपलब्ध करण्यात आले आहे.

Google ने आपल्या वार्षिक I/O 2025 डेव्हलपर इव्हेंटमध्ये अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI मधील नव्या फीचर्सची घोषणा केली आणि अमेरिकेमध्ये हे सवाप्रथम सुरु केले पण हे फीचर्स आता भारतातही वापरासाठी उपलब्ध होत आहेत. ह्या AI टूल्सचा वापर करून आपण अगदी सेकंदात कठीण काम कमी ववेळात पूर्ण करू शकतो व याचा वापर करून आपण आणखी आकर्षक गोष्टी करी शकतो.

भारतात वापरता येणारे प्रमुख AI फीचर्स

Google AI Mode India 2025, Google I/O 2025 updates in Marathi गूगल ने २४ जून २०२५ ला दिलेल्या माहितीनुसार खालील AI फीचर्स आता भारतात देखील उपलब्ध.

AI Mode: Deep Think आणि Flash

AI Mode हा Gemini 2.5 च्या कस्टम व्हर्जनवर आधारित सर्च अनुभव असणार आहे ह्यामध्ये देखील दोन प्रकार आपल्यला पाहायला मिळणार आहे. Gemini 2.5 Pro आणि Gemini 2.5 Flash हे असणार आहे.

Gemini 2.5 Pro ह्यामध्ये आपल्याला ‘Deep Think’ मोडसह, अतिशय कठीण गणिती किंवा कोडिंग सारख्या समस्यांवर हे मॉडेल खोल विचार करून अचूक उत्तरं देणार आहे ते ही अगदी सेकंदात.

Gemini 2.5 Flash हे सर्वात वेगवान आणि मोठ्या प्रमाणार माहिती मजकूर, कोड ह्याचसोबत प्रतिमा व लॉजिकसह काम करणारे AI मॉडेल. ह्याच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील सर्वच कामे अगदी वेगाने पूर्ण केले जाऊ शकते.

हे दोन्ही प्रकार आता विकसकांसाठी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी भारतातही उपलब्ध आहेत पण महत्वाचे म्हणजे जर तुम्ही अधिक जास्त वर करत असाल तर तुम्हाला काही चार्जेस पण द्यावे लागतील. सध्या तुम्ही हे सर्व मॉडेल फ्री मध्ये वापरू शकता.

AI Mode सर्च व्हॉइस व इमेज सह

भारतामध्ये साध्यस्तीतीला Google Lens आणि Voice Search यांचा वापर सर्वाधिक होत आहे. Google AI Mode हे लक्षात घेऊन मल्टीमोडल सर्च उपलब्ध करून देत आहे देत आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने व्हॉइस सर्च म्हणजे मायक्रोफोनवर टॅप करून आता आपण मोठे प्रश्न बोलून विचारू शकतो यासोबतच गुगल ने इमेज सर्च देखील लॉन्च केले आहे ह्यामध्ये आता डायरेक्ट फोटो काढा किंवा अपलोड करा आणि AI Mode ला तुमचे प्रश्न विचारा.

उदाहरण: समजा तुम्हाला एखादे झाड आवडले आहे तर तर तुम्ही फोटो कडून असे विचारू शकता – हे कोणत झाड आहे? आणि ते कसं लावायचं व सांभाळायचं? यानंतर AI Mode झाड ओळखून संपूर्ण माहिती, स्टेप-बाय-स्टेप गाइड करेल व झाड कुठून खरेदी करायला पाहिजे ते ही लिंक सोबत सांगेल.

भारतासाठी हे फीचर्स महत्वाचे – Google AI Mode India 2025

आत्तापार्येंत AI मधील महत्वाचे Deep reasoning, Text, Voice आणि Image Input, Personalized Smart Search हे फीचर्स केवळ अमेरिका किंवा युरोपापुरते मर्यादित होते. परंतु Google ने यातील अनेक टूल्स भारतातही उपलब्ध करून दिले आहेत. AI Ultra सारखे प्रीमियम प्लॅन देखील वापरकर्त्यांसाठी खुले आहेत, तर Gemini, Gmail Smart Replies व Meet चे फीचर्स हळूहळू अधिक वापरकर्त्यांपर्यंत उपलब्ध होत आहे.

Google च्या AI जगतातील पुढील प्रत्येक अपडेट्स, नवीन सर्च फिचर्स, Gemini updates बद्दल लेटेस्ट माहिती साठी व ताज्या बातम्यांसाठी, www.LokMarathi.com ला नियमित भेट द्या!

गूगल ने २४ जून २०२५ ला दिलेल्या माहितीनुसार संदर्भ घेतला आहे, हिमा बुडराजू, उपाध्यक्ष, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, Google Search यांनी या Google Search: Introducing AI Mode in India पोस्ट चा माध्यमातून माहिती दिली आहे तुम्ह खालील लिंक वर जाऊन पाहू शकतात.

Source Google AI Mode India: Google Introducing AI Mode in India

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile