Vaibhav Suryavanshi U19 Record: भारताच्या अंडर-१९ संघातील वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध केवळ ३१ चेंडूत तब्बल ८६ धावांची तुफानी खेळी करत ९ षटकार ठोकले. ह्या खेळीने आता वैभव सूर्यांशी हा ऋषभ पंतनंतर U19 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. फक्त १४ वर्षांचा खेळाडूने IPL मधील धडाकेदार कामगिरी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये देखी त्याचे दमदार कौशल्य दाखवले आहे.
IND vs ENG U19 सामना दिनांक २ जुलै २०२५, इंग्लंड
वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमध्ये धडाकेबाज कहर!
भारतीय U19 संघाचा फक्त १४ वर्षांचा युवा खेळाडु वैभव सूर्यवंशी IPL पासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पंरंतु आता मात्र त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त ३१ चेंडूत ८६ धावांची जबरदस्त खेळी साकारत सर्वच चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. या खेळीत त्याने तब्बल ९ षटकार आणि ६ चौकारांची आतिषबाजी करत काही रेकॉर्डस् देखील नावावर केले.
Vaibhav Suryavanshi U19 Record
IND vs ENG U19 च्या ३ ऱ्या सामन्यात वैभवने फक्त २० चेंडूत धमाकेदार अर्धशतक केले, या ऐतिहासिक उच्चस्तरीय खेळामध्ये आता तो ऋषभ पंत नतंर दुसरा सर्वात जलद अर्धशतक बनवणारा खेळाडू बनला आहे. (Vaibhav Suryavanshi U19 Record)
Indian Under 19 second fastest fifty: वैभव ने या सामन्यात फक्त २० चेंडूत अर्धशतक झळकावले पण या आधी भारतीय खेळाडू ऋषभ पंतने Indian Under 19 मध्ये फक्त १८ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक बनवलेले आहे, परंतु वैभवने कमी वयात भारतीय U-19 क्रिकेट मध्ये तो दुसरा सर्वात जलद अर्धशतक करणारा ठरला आहे.
विशेष बाब म्हणजे वैभवने हे अर्धशतक केवळ सामन्याचा ६व्या ओव्हर मधेच पूर्ण केले.
वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळीची आकडेवारी Runs Score
| खेळाडू | चेंडू | धावा | चौकार 4s | षटकार 6s | स्ट्राइक रेट |
| वैभव सूर्यवंशी | 31 | 86 | 6 | 9 | 277.41 |
वैभवला शतक बनवण्यासाठी फक्त १४ धावांची गरज होती, परंतु एवढ्या कमी वयात आणि Under 19 संघात त्यांनी मोलाचे योगदान दिले आणि धावांचा भक्कम पाया बनवला.
इंग्लंडचा vs भारता स्कोअर
IND-U19 vs ENG-U19 तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४० षटकांत २६९ धावांचं लक्ष्य दिलं आणि यालाच प्रतिउत्तर देताना भारत केवळ ३४.३ षटकांत विजय मिळवला. भारताच्या चांगल्या जोरदार सुरवातीमुळे हे शक्य झाले असून याचे मुख्य श्रेय प्रामुख्याने वैभवलाच जाते. (पावसामुळे हा सामना केवळ ४० षटकाचाच केला होता.)
Vaibhav Suryavanshi Profile
नाव: वैभव सूर्यवंशी
संघ: भारत अंडर-१९
खेळाडू: उजव्या हाताने फलंदाजी
प्रेसरना: सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत
ENG U19 सामन्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये वैभव अर्धशतकाजवळ जाऊन बाद झाला होता. मात्र या ३ ऱ्या सामन्यात त्याने ती कसर भरून काढत स्वतःचं नाव क्रिकेटच्या नव्या सुपरस्टार्समध्ये कोरलं आहे.
Vaibhav Suryavanshi U19 Record: वैभव सूर्यवंशीच्या खेळीनं भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधलं आहे. त्याच्या बॅटमधून निघणारी प्रत्येक चेंडू भविष्यात भारताच्या सीनियर संघातील आक्रमणाचं शस्त्र बनवता येईल. सध्या तरी, तो अंडर-१९ क्रिकेटमधील एक नवीन ‘सुपरस्टार’ म्हणून सध्या उभा आहे. अश्याच कामगिरीने तो लवकरच आपल्यला भारतीय संघाकडून देखील फलंदाजी करण्यास पाहायला मिळेल.
ताज्या बातम्या, क्रीडा, मनोरंजन, तंद्राज्ञान आणि कृषी क्षेत्रातील लेटेस्ट बातम्यांसाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या.







