Shubman Gill Double Century: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट मालिकेमध्ये भारतीय कर्णधार शुभमन गिल याने जबरदस्त फलंदाजीने इतिहासच रचला आहे. गिलने ऐकून 387 चेंडूत तब्बल 269 धावांची महत्वपूर्ण खेळी करत टेस्ट क्रिकेटमधील कर्णधार म्हणून आत्तापार्येंतची सर्वात मोठी धावसंख्या केली आहे.
एजबस्टन, ३ जुलै २०२५ England vs India, 2nd Test, गिलच्या या शानदार द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वाधिक 587 धावांचा डोंगर उभारला आहे. शुभमन च्या या खेळीने आता सामन्यात जोरदार पकड मिळवली आहे. इंग्लंडने या टेस्ट च्या दुसऱ्या दिवसअखेर ३ गड्यांच्या बदल्यात फक्त ७७ धावा केल्या असून ते अजूनही भारताच्या 510 धावांनी पिछाडीवर पाहायला मिळत आहे.
IPL तयारीमुळे वाढला आत्मविश्वास, शुभमन गिल
Shubman Gill सामना संपल्यानंतर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत या द्विशतकाच्या मागील तयारीचा खुलासा करत सांगितले की, “IPL 2025 च्या अखेरच्या टप्प्यातच टेस्टसाठी तयारी सुरू केली होती. त्याचा हा फायदा झालेला दिसून येत आहे. सध्या मी चांगल्या स्थितीत आहे आणि मेहनतीने इथे पोहचलो आहे”
Shubman Gill Double Century
| IND 1st Inning | धावा | चेंडू | चौकार | षटकार | स्ट्राइक रेट |
| शुभमन गिल C | 269 | 387 | 30 | 3 | 69.51 |
टेस्ट फिल्डिंगमुळे खंत व्यक्त
मुलाखती दरम्यान गिलने लीड्स टेस्टमध्ये टीम इंडियाच्या कमकुवत फिल्डिंगवर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले, “मी काही दिवस स्लिपमध्ये पोसिशन मध्ये कॅच प्रॅक्टिस करत नव्हतो आणि मी जास्तीत जास्त बॅटिंगवर लक्ष देत होतो. परंतु फिल्डिंग अत्यंत महत्त्वाची आहे आणि यावर आम्ही टीम मीटिंगमध्ये चर्चा केली. जर आपली फिल्डिंग चांगली झाली असती, तर आपल्याला खूप अधिक फायदा झाला असता.”
लीड्स टेस्टमध्ये 8 कॅच सोडले
Eng vs Ind Test Cricket Match: भारताला लीड्समध्ये ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या मध्ये पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात २ कॅच भारतीय खेळाडूंनी सोडले होते. त्यामुळे इंग्लंडने सामन्यांमध्ये दबदबा कायम ठेवला होता. गिलने यावर बोलताना स्पष्ट सांदीतले आहे आता फिल्डिंग सुधारण्याची गरज आहे.
Shubman Gill Double Century आणि नेतृत्वाने भारतीय टीमने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. त्याची बॅटिंग ही भारताच्या विजय पल्लवित करणारी आहे. येणाऱ्या दिवसांत इंग्लंडला फॉलोऑन टाळण्यासाठी आता खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हे दिसून येत आहे.









