AB de Villiers WCL 2025: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू एबी डी व्हीलियर्सने पुन्हा एकदा चर्चेचा विषयच बनला आहे. तांबडतोड विस्फोटक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या एबीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध फक्त 39 चेंडूत शतक झळकावत सलग दुसरे शतक साजरे केले. हे शतक त्याने लीड्स येथील मैदानावर साऊथ आफ्रिका चॅम्पियन्स संघाकडून खेळताना केले.
एबी डी व्हीलियर्स आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जरी ४ वर्षे झाली असली तरी त्याची धावांची भूक आजही कायम तशीच दिसून येत आहे, तीच 360 खेळी आजही फॅन्सचे मन जिकंत अली आहे.
AB ची धडाकेबाज खेळी
एबीने या डावात फक्त 46 चेंडूत तब्बल 123 धावा केल्या यात ऐकून 8 षटकार आणि 15 चौकार त्याने लगावले. आणि महत्वाचे म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट देखील 267.39 इतका होता. या सामन्यात त्याने ब्रेट ली आणि पीटर सिडलसारख्या नामवंत गोलंदाजांचीही चांगलीच ताबडतोड धुलाई केली. AB जसा पहिल्या शैलीत खेळायचा तीच शैली तोच खेळ आज पाहायला मिळाला.
सलग दुसरे शतक
WCL 2025 मधील 24 जुलै 2025 रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 41 चेंडूत शतक केल्यानंतर, आता 26 जुलै ला एबीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणखी जबरदस्त खेळी केली. पाकिस्तानविरुद्ध खेळता न आल्याने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या सामन्यात एबीने कमबॅक करत आपला क्लास पुन्हा जगाला दाखवून दिला आहे.
फॅन्स सामना पाहण्यासाठी उत्सुकता
AB de Villiers WCL 2025 ची हीच खेळी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून त्याच्या चाहत्यांनी याला ‘रिटायरमेंटनंतर देखील तोच अंदाज आणि तोच फॉर्म’ असे संबोधले आहे.
AB de Villiers WCL 2025
येथे पहा AB ची धडाकेबाज खेळी CENTURY –
स्पोर्ट्स: आंतराष्ट्रीय, टीम इंडिया, BCCI, क्रिकेट वेळापत्रक आणि खेळाडूंच्या घडामोडी यासारख्या सर्व अपडेट्ससाठी लोकमराठी या संकेतस्थळाला नेहमी भेट देत रहा: महाराष्ट्रातील घडामोडींसाठीचे BEST मराठी न्यूज पोर्टल लोकबातमी!
Visit: WCL Cricket Official Site










