27th July | Raj Thackeray Matoshree Visit 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याची सर्वात महत्त्वाची घडामोड मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर ‘मातोश्री’ निवासस्थानी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली. आज २७ जुलै उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून, त्या निमित्ताने राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने Uddhav-Raj पुन्हा एकत्र
Raj Thackeray आज सकाळी ११:३० च्या सुमारास दादरमधील राहत्या शिवतीर्थ निवासस्थानावरून निघाले आणि १२ वाजता मातोश्रीवर पोहोचले. तिथे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि स्नेह दिसले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गुलाबांचा गुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एकत्र फोटोसेशनही केलं.
राज ठाकरें शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोतश्रीवर आले. राज यांच्यासोबत सर नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर हे मनसेचे प्रमुख नेते देखील आज उपस्थित होते. यामळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात नवा राजकीय अध्याय सुरू होतोय का? सध्या या चर्चेला उधाण आलेले दिसून येत आहे.
शिवसैनिक, मनसेसैनिकांमध्ये उत्साह – राजकीय चर्चेला उधाण
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray ही भेट केवळ वाढदिवसापुरती मर्यादित तर पुढे युतीच्या शक्यतेकडे वाटचाल ठरवणारी असणार आहे, यावर आता विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सध्या दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये युती होण्याची शक्यतेला राजकीय वर्तुळात जोर धरलेला दिसून येत आहे.
लाईव्ह सामtv:
Raj Thackeray Matoshree Visit
Raj Thackeray Matoshree Visit: मातोश्रीवर शिवसैनिकांचा जल्लोष, उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली असून हजारो शिवसैनिक साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावत आहेत. सध्या ठाकरेंच्या या ऐतिहासिक भेटीमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून सर्वजण खुश पहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र भाषा विजयी मेळावा नंतर 22 दिवसानी राज-उद्धव पुन्हा एकत्र तेही मातोश्री वर आल्याने मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मातोश्रीच्या परिसरात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा मनसेसैनिक आणि शिवसैनिकांनी एकाच वेळी जल्लोष देखील केला.







