Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी सुवर्णसंधी! मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 18 जुलै 2025 रोजी सर्वात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात लवकरच तब्बल 13,560 पोलीस रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीच्या चर्चा सुरु होतीच आणि अखेर मुख्यमंत्रीणकडून आता अधिकृत घोषणाही झाली आहे.
मागील तीन वर्षांत 38,802 पदांची भरती
मुख्यमंत्री Devendra Fadnavis या चालू अधिवेशनात म्हणाले की, मागील तीन वर्षांत 38,802 पदांची पोलीस भरती यशस्वीरीत्या झाली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश होता. आता या पुढील टप्प्यात अजून उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आता नव्याने गृह विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला प्रशासनाकडून मान्यता मिळाली असून ऑक्टोबर 2025 पासून भरती प्रक्रेला सुरुवात होणार आहे.
13,560 पोलीस भरती प्रक्रियेला ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यात मध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई, बँड समन आणि राज्य राखीव पोलिस दलातील अंमलदार पदांचा समावेश असणार आहे. या 13,560 पोलीस विभागातील भरती प्रक्रियेत सर्वप्रथम मैदानी चाचणी घेतली जाईल, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात हे ही स्पष्ट केले आहे की मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे आता उमेदवारांना फक्त एकाच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे.
CM Devendra Fadnavis 18 July 2025:
Maharashtra Police Bharti 2025 मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिली माहिती
विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भातील महत्वाची माहिती दिली. या चर्चेत ऐकून ३० सदस्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये त्यांनी सांगितले की, पोलीस दल हे कायदा-सुव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. वाढत्या सुरक्षेच्या गरजेमुळे ही भरती अत्यंत गरजेची असून ही भरती पारदर्शक आणि वेळेत पूर्ण केली जाईल व त्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव गृह विभागाकडून केंद्राला पाठवला गेला असून Maharashtra Police Bharti 2025 साठी केंद्र सरकारकडूनही सहकार्य मिळणार आहे.
Maharashtra Police Bharti 2025: सध्या राज्यातील हजारो विद्यार्थी पोलीस दलात भरती होण्यासाठी दररोज तयारी करत आहेत आता ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की, पोलीस भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल आणि पारदर्शकपणे पार पडेल. या भरतीबाबत अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, आता उमेदवारांनी जास्त वेळ न घालवता तयारी वेळेत करावी.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय भरती व महत्त्वाच्या घडामोडींसाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या…
अधिक माहितीकरिता भेट द्या महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत संकेतस्थळ









