महादेवी हत्तीणीचा भावनिक निरोप: ३५ वर्षांची साथ, न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातला रवाना Mahadevi Elephant

Date:

Mahadevi Elephant नांदणी, कोल्हापूर 29 जुलै : मागील ३५ वर्षांपासून नांदणी, तालुका शिरोळ गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठात राहणारी महादेवी हत्तींनी अखेर सोमवारी रात्री भावनिक वातावरणात गुजरातकडे रावण झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाली निर्णयानंतर आणि माठाने सर्वोच न्यायालयात केलेल्या याचिका फेटाळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, आता महादेवी हत्तीणीला गुजरातमधिल वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले आहे.

महादेवी हत्तीण अनेक दशके नांदणी मठाचा भाग होती. तेथील धार्मिक कार्यक्रम असो किंवा उत्सव गावकऱ्यांचा दैनंदिन दिवसात तिची महत्वपूर्ण भूमिका असायची. पण न्यायालयाच्या या निर्णयाने सोमवारी मठाच्या परिसरात हजारो लोक एकत्र येत तिला निरोप दिला यादरम्यान सर्वानाच अश्रू अनावर झाले. महिलांनी औक्षण करताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिला आशीर्वाद दिले. यादम्यान संपूर्णच गावात भवानीक वातावरण झाले.

महादेवीच्या डोळ्यातून अश्रू

माठाने दिलेल्या माहितीप्रमाणे, Mahadevi Elephant ही केवळ चार वर्षाची असताना कर्नाटक मधून तिला नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठात आणले होते. महादेवी हत्तींनी ही तेथील धार्मिक कार्यक्रमासोबतच नांदणी, जयसिंगपूर शहर परिसरात वावर असून सर्वच गावकऱ्यांचे तिच्यावर मनापासून श्रद्धा होती. तिला सोमवार 29 जुलैला निशीदीपासून मठाकडे नेत असताना यावेळी चक्क महादेवीच्याच डोळ्यातून अश्रू येऊ लागल्याने सर्वच गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. सर्वच गावकर्यांनी याला भरपूर विरोध देखील केला पण शेवटी माठाने सांगितले कि सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आम्ही मान्य करतो. आमच्या महादेवीचे संगोपन चांगले व्हावे अशी भावना आमच्या सर्वच गावकऱ्यांची आहे. आम्ही महादेवीला कधीच विसरणार नाही असं नांदणी पट्टाचार्य महास्वामी स्वस्तिशी जिनसेन भट्टारक यांनी संदेश दिला.

सकाळ मीडिया रिपोर्ट Watch on X / Twitter

Mahadevi Elephant गुजरातला रावना

29 जुलै सोमवारी सायंकाळी सायंकाळी ५ नंतर मठामध्ये गर्दी वाढली आणि या दरम्यान शासनविरोधात घोषणाही देण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा तिला अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे पाठवण्यात आले. यावेळी तिच्या डोळ्यांतूनही अश्रू दिसून आले, ज्याने उपस्थित सर्वांना आणखीच भावनिक केलेले दिसले.

या मिरवणुकीच्या वेळी अचानक काही लोकांनी पोलिस वाहनांवर दगडफेक देखील केली. हि घटना तेथील भरत बँकेजवळ घडली होती.

कायदेशीर लढ्याचा शेवट

भारत सरकारने आणलेल्या जीआर प्रमाणे हत्तीणीच्या धार्मिक उपयोगावरून सुरु झालेला संघर्ष 2020 पासून न्यायालयात सुसरूच होता परंतु मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य देत महादेवी हत्तीणीला दोन आठवड्यात वानतारा, गुजरात येथे पाठवण्याचे आदेश दिले. यानंतर मठ आणि गावातील लोकांनी याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु तेथे देखील हाच निर्णय कायम ठेवला आणि आता महादेवीला गुजरात येथील वनतारा (Vantara Elephant) केंद्रात नेण्यात येत आहे.

मठाचे प्रमुख स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी शेवटी जाताना भावनिक प्रार्थना केली ते म्हणाले महादेवी आमची एक सदस्यच होती. आम्ही हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करतो, परंतु आता तिची आठवण आम्हाला कायम राहील. यासोबतच सर्व गावकऱ्यांनी महादेवीच्या चांगल्या संगोपनासाठी प्रार्थना केली.

महारष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या…

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile