Ladki Bahin Yojana Rakshabandhan Gift 2025: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु आता जुलै-ऑगस्ट 2025 चा हप्ता एकत्र मिळणार असल्याच्या चर्चेला सध्या वेग आला आहे. यावेळी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 असल्याने हा हप्ता डबल म्हणजेच ₹3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रक्षाबंधन 2025, लाडक्या बहिणांना मिळणार 3000 रुपये?
मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये देखील जुलै व ऑगस्टचे हप्ते एकत्रित 17 ऑगस्ट रोजी मिळाले होते. तसेच यावेळी ही सारखाच पॅटर्न असू शकतो. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर 9 ऑगस्ट किंवा त्याआधी Ladki Bahin Yojana Rakshabandhan Gift रक्कम जमा केली जाऊ शकते.
कोणाला वगळले जाणार?
लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी सरकारने काही महत्त्वाचे निकष ठेवले होते त्यांवर सरकाने मधील काळात पड्लताळणी केली असून त्यातील भरपूर महिलांनी पात्र नसताना देखील अर्ज करून लाभ घेतल्याचे निदर्शनास आले होते आता त्यानुसार ज्या महिलांचे ऐकून वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख पेक्षा जास्त असले त्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे आणि चारचाकी मालक किंवा आयकर भरणाऱ्यांनाही आता हा लाभ नाकारला जाणार आहे. मधील काळात ज्यांनी पीएम किसान म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे लाभ घेतला आहे किंवा घेत आहे ते ही त्यांना फक्त ₹500 हप्ता मिळणार आहे. याशिवाय अनेक उर्वरित महिलांची पडताळणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्यातील अपात्र लाभार्थ्यांना यादीतून वगळले जाणार आहे.
2100 चा नवीन हप्ता कधी?
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचे वचन जनतेला दिले होते. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही वाढ मार्च-एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या दरमहा ₹1500 रुपयेच दिले जात आहेत. सध्या चालू 2025-26 च्या अर्थसंकल्पात 36,000 कोटींचीच तरतूद या योजनेसाठी केलेली आहे.
Ladki Bahin Yojana पडताळणी स्थगित
लाडकी बहीण योजनेचा फायदा खरच पात्र महिलांनाच मिळतोय कि नाही का या योजनेचा चुकीचा वापर केला जातोय हे पाहण्यासाठी राज्य सरकार कडून फेर पडताळणी काही महिन्यापासून सुरु झाली होती. दिलेल्या सरकारी नियमानुसार इनकम टॅक्स भरणाऱ्या महिला, चारचाकी असलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात सुरवात झाली होती. परंतु सरकारने आता ही पडताळणी स्थगित केल्याचं सध्या बोलल जात आहे.
येणाऱ्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही पडताळणी थांबवल्याच्या चर्चा आहेत. महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका लक्षात घेऊन ही छाननी प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना चालू असल्याप्रमाणे लाभ दिला जाईल. निवडणुका संपल्यानंतरच सरकार छाननीबाबत सक्त पावले उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana Rakshabandhan Gift: लाडकी बहीण योजनेचा जुलै-ऑगस्ट 2025 चा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदर एकत्र मिळण्याची शक्यता आहे. हा हप्ता एकत्र मिळणार की नाही, यावर अद्याप सरकारकडून औपचारिक अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी मागील अनुभव पाहता यावेळेस देखील महिलांना ₹3000 ची रक्कम मिळू शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपली पात्रता आणि बँक खात्याची KYC स्थिती चेक करत राहणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी लोकाबातमी पोर्टल ला दररोज भेट द्या…
अधिकृत सरकारी वेबसाईट: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना










