Maharashtra Ladki Bahin Yojana Fraud: महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांसाठी आर्थिक मदत पुरवणारी आत्तापार्येंतची सर्वात आर्थिक मणी महत्वाकांक्षी योजना ठरली. मात्र याच अल्प काळात योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये तब्बल 14,298 पुरुषांनी महिलांच्या नावावर लाभ घेतल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे ऐकून 21.44 कोटी रुपयांचा निधी चुकीच्या व्यक्तींच्या खात्यात गेला आहे हा गैरव्हवहार समोर आला. आता सरकारपुढे मोठे आव्हाहन असून विरोधक देखील आक्रमक झालेले दिसून येत आहेत यातच हे पैसे परत मिळणार का हा प्रश्न उपस्तित झाला आहे.
14,298 पुरुषांनी घेतला Ladki Bahin योजनेचा लाभ
महाराष्ट्रातील शिंदे सरकार मार्फत ऑगस्ट 2024 पासून सुरु झालेल्या लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन दिले जाते. पण सध्याच्या आकडेवारीनुसार यामध्ये तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा 10 महिने लाभ घेतला होता. हे प्रकरण तात्काळ समोर आल्यानंतर त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. सध्या सरकार या रकमेची परतफेड कशी आणि कश्याप्रकारे घेणार यावर लवकरच निर्णय घेणार आहे.
संशयित लाभार्थ्यांची मोठी संख्या
Ladki Bahin Yojana Fraud लाडकी बहीण घोटाळ्यात आणखी एक गंभीर बाब समोर अली आहे ज्यामध्ये तब्बल 2 लाख 36 हजार लाभार्थ्यांविषयी शंका व्यक्त करण्यात आली असून अनेकांनी महिलांची नावं, आधार किंवा बँक तपशील वापरून योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरु झाली आहे.
Saam Tv News Report:
65 वर्षांवरील वृद्ध महिलांनीही घेतला लाभ
‘लाडकी बहीण’ ही योजना फक्त 65 वर्षांखालील महिलांसाठीच असली तरी आत्तापार्येंत ऐकून 2.87 लाख ज्येष्ठ महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले आहे. त्यामुळे योजनेच्या मूळ उद्दिष्टावरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सरकारपुढे मोठं आव्हान
Maharashtra Ladki Bahin Yojana या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी अंदाजे 42,000 कोटी रुपये इतका खर्च करत आहे. मात्र यातील अश्या गैरव्यवहारामुळे पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. आता सरकार पुढील काळात अपात्र Ladki Bahin Yojana Fraud लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार का? आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी लोकबातमी पोर्टल ला दररोज भेट द्या…










