Jayakwadi Dam Alert 30 July 2025: राज्यात विविध भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आता नाथसागर, जायकवाडी धरणही पूर्ण भरण्याचा अंतिम टप्प्यावर आहे. राज्यातील चांगला पाऊस आणि वरच्या धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नाथसागर धरण भरतीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर आणि नाशिक भागात झालेला दमदार पाऊसाने गोदावरी खोऱ्यातील तब्बल 24 धरणांमध्ये ऐकून 103.82 टीएमसी पाणीसाठा झाला आहे पण यातील उपयुक्त साथ 76 टीएमसी (86%) इतका आहे. याचप्रमाणे जायकवाडी धरणामध्ये ही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असून ऐकून पाणीसाठा 93 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे यामुळे धरणाच्या ऐकून क्षमतेच्या जवळपास हा साठा पोहचला आहे. यामध्ये जुन महिन्यात ऐकून 49 टीएमसी पाण्याची नवीन अवाक झाली आहे.
पूरस्थितीची शक्यता, प्रशासन सतर्क (Jayakwadi Dam Alert)
Jayakwadi Dam सह राज्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे या धरणांमध्येही 85 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. यामध्ये विशेषतः नाशिक मधील दारणा, गंगापूर, मुकणे, करंजवण, तर नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे आदी धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आवक सुरु आहे. यामुळेच आता गोदावरी, मुळा व प्रवरा नद्या पात्रता ओलांडून वाहू लागल्या आहेत.
Jayakwadi Dam Alert उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील मुसळधार पसामुळे आता प्रशासनाने संभाव्य पूरस्थितीचा इशारा देत नदीकाठच्या सर्वच गावांमध्ये दवंडी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वच नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून त्यांची घरगुती, शेतीचे साहित्य आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे संकेत प्रत्येक गावात देण्यात आले आहे.
धरणे भरण्याच्या अंतिम टप्प्यावर
महाराष्ट्रातील प्रमुख धरणे आता त्यांच्या पात्रतेच्या अंतिम टप्यावर
- जायकवाडी नाथसागर धरण – 93 टीएमसी भरले
- भंडारदरा धरण – 88% भरले
- निळवंडे धरण – 89% भरले
- मुळा धरण – 82% भरले
मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी जास्त पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात जुलै महिन्याअखेरीसच मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये 47.93 टीएमसी पाणीसाठा होता तर यावेळी आता 75.53 टीएमसी साठा झाला आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या…
माहिती – महारष्ट्र जलसंपदा विभाग







