Devendra Fadnavis: रक्षाबंधनाची भेट, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ मोठी घोषणा!

Date:

Raksha Bandhan, 09 ऑगस्ट 2025: आज रक्षाबंधनाच्या विशेष कार्यक्रमात Devendra Fadnavis यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी घोषणा केली, यामध्ये आता योजनेच्या रकमेत वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मागील वर्षांपासून निवडणुकीपूर्वी चालू झालेल्या ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin) योजनेने लाखो गरजू महिलांच्या बँकेत ही मदत मिळत आहेत. या वर्षात झालेल्या निवडणुकीदरम्यान महायुतीमधल्या काही नेत्यांनीच रकमेत वाढ होणार असून 2100 रुपये होणार असल्याचे आश्वासन दिले होते पण आता त्यांचे सरकार असून देखील ही वाढ झालेली नाही. आज रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनीच यावर भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सावत्र भावांचे अडथळे – फडणवीस

आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले “आम्ही लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न करत असताना काही सावत्र भाऊ कोर्टात जाऊन याविरोधात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. योजना सुरू राहू नये म्हणून भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले गेले पण यामध्ये पैसा थेट बहिणींच्या खात्यात जात असल्याने भ्रष्टाचार शक्यच नाही, भ्रष्टाचार त्यांचाच डोक्यात आहे”

त्यांनी पुढे टोला लावत म्हणाले, सावत्र भाऊ जोपर्येंत सावत्र भावासारखेच वागतील तोपर्येंत बहिणी त्यांना साथ देणारच नाही.

पुढील पाच वर्षे योजना सुरुसच राहील, योजनेच्या रकमेत वाढ लवकरच

Raksha Bandhan special announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज स्पष्ट केली की “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना महाराष्ट्रात चालताना ‘लाडकी बहीण’ ही म्हत्वाची योजना सुरू झाली. अनेकांना अस वाटायचं की हे भाऊ फक्त निवडणुकीपुरते पैसे देतील आणि निवडणूक झाले की बंद करतील पण निवडणुकीनंतरही पुढील पाच वर्षे ही योजना अखंडपणे सुरूच राहणार एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीत वाढही आम्ही करणार आहोत.”

मुख्यमंत्र्यांनी हे पण मान्य केल की काही पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून या योजनेचा दुरुपयोग केला, पण आता त्यांवर कारवाईला सुरवात झाली आहे. यामध्ये ते बोलताना म्हणाले “काही लोकांनी याचा थोडासा दुरुपयोगही केलेला आढळून आला. काही इतके हुशार भाऊ निघाले की त्यांनी बहिणींच्या नावावर अर्ज भरले आणि पैसे घेणं सुरू केलंत”

महिलांमध्ये समाधान तर विरोधकांकडून टीका

Raksha Bandhan special announcement आज रक्षाबंधनाच्या दिवशी फडणवीस यांच्या घोषणेनंतर सर्वच लाडक्या बहिणी आनंदी आहेत, पण विरोधक मात्र तारीख जाहीर करण्याची मागणी करत आहेत.

या रक्षाबंधनाच्या दिवशी फडणवीसांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी लोकबातमी ला दररोज भेट देत राहा…

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile