Orange peel for skincare: उन्हाळ्यात किंवा प्रदूषणाने आपली त्वचा वारंवार खराब होत राहते. आणि त्वचेच्या संबंधित अनेक अडचणी देखील येऊ लागतात. कडक सूर्यप्रकाश पण आपल्या त्वचेची चमक काढून घेतो त्यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसू लागते. ह्या सर्व समस्या पासून वाचण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा उपयोग करू शकता.
Orange peel for skincare
सर्व सीझनमध्ये अगदी सहज उपलब्ध होणारे संत्र आपल्या खाण्यासोबतच आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन C आणि कॅल्शियम चा उत्कृष्ट असा घटक आहे. पण अनेकदा लोक काय करतात संत्र खाऊ साल (Orange peel) फेकून देता पण त्वचेची चमक कायम राखण्यासाठी तुम्ही त्या सालीपासून फेस पॅक बनवू शकता. संत्र्याच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सारखे स्त्रोत आढळतात जे आपल्या त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात.
चला तर मग जाणून घेऊयात संत्र्याच्या सालीचा फेस पॅक कसा बनवायचा Natural remedies for dry skin:
Taning साठी संत्र्याच्या सालीची पावडर आणि तांदळाचं पीठ
सर्वात आधी हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यात संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे आणि आवश्यकतेनुसार गुलाबजल त्यात मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याची एक घट्ट पेस्ट बनेल एवढ.
Orange peel for tan removal: आता हा पॅक 10 ते 15 लाऊन नंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुऊन टाकायचा आहे. ज्यामुळे आपली त्वचा तेजस्वी राहण्यास मदत होईल.
Dray skin साठी Oraeng pil powder आणि बेसन पीठ
जर तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि एक चमचा बेसन पीठ घ्या त्यात मध घालून त्याची मध्यम पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.
ह्या पॅक मुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती सॉफ्ट होण्यास मदत होईल.
Dark spots साठी संत्र्याच्या सालीची पावडर आणि Aloe vera jel
Alovera jel म्हणजेच कोरफड ह्या मधे व्हिटॅमिन E हा घटक असून जो आपल्या त्वचेवरील व्रण कमी करण्यास मदत करतो आणि आपली त्वचा तेजस्वी ठेवण्यास देखील फायदेशीर ठरतो. तर चला बघूया हा फेस पॅक कसा तयार करायचा
एका वाटीमध्ये 2 चमचे कोरफडीचा गर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घालायची आहे आणि त्या पेस्ट मधे 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकून ही पेस्ट चांगली मिक्स करून मग चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.
ह्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लाऊ शकता.
Remove dead skin naturally साखर आणि संत्र्याच्या सालीची पावडर…
Remove dead skin naturally: हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर स्क्रब सारखा वापरू शकता. यासाठी एका बाऊलमधे 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि अर्धा चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून ह्या पॅक ने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करून 5 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा पॅक आपल्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतो.
आयुर्वेदिक आणि सौंदर्य टिप्ससाठी दररोज LokMarathi.com ला भेट द्या.







