नितीन गडकरींच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, मोठी बातमी! काय घडलं? Nitin Gadkari Flight Emergency Landing

Updated On:

Nitin Gadkari Flight Emergency Landing Gaya Airport: देशात पुन्हा एकदा विमानसेवेतील चिंताजनक घटना आज समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानाचे बिहारमधील गया विमानतळावर अचानकच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आज नितिन गडकरींना घेऊन हे विमान रांचीच्या नियोजित कार्यक्रमासाठी जाणार होते. पण मात्र, हवामानातील अचानक बदलांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Nitin Gadkari Flight Emergency Landing

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे विमान आज गुरुवारी सकाळी रांचीकडे निघाले असताना मात्र वाटेतच झारखंड आणि बिहार भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे हवेतील दृश्य मानता ही कमी झाली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाला गया येएरपोर्ट येथे उतरवण्याचा इमर्जन्सी निर्णय घेण्यात आला. गया विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान वळवले जाणार असल्याचे ३० मिनिटे आधीच कळवण्यात आले होते, आणि तत्काळ सर्व यंत्रणा ह्या लँडिंगसाठी सतर्क करण्यात आल्या होत्या. व्हीआयपी प्रतीक्षालयात गडकरींसाठी विश्रांतीची सोय यादरम्यान करण्यात आली होती.

रांचीसाठी विशेष विमानाची व्यवस्था

हवामान स्थिर झाल्यावर गया एअरपोर्ट वरून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि नितीन गडकरी रांचीसाठी रवाना झाले. या दरम्यान, गडकरींनी आणखी कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र गया विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या फोटोंमध्ये ते दिसून येत आहे.

सध्या गेल्या काही दिवसांपासून विमान सेवेतील अनियमितता यासोबतच तांत्रिक बिगाडी आणि वाढत चालेल्या घटना. जसे कि काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद विमानतळावर एका विमानाच्या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरवला होता. आता या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींसारख्या वरिष्ठ नेत्याच्या विमानाची सुद्धा इमर्जन्सी लँडिंग ही आणखी एक गंभीर सूचना मानली जात आहे.

Nitin Gadkari Flight Emergency Landing गडकरींच्या या इमर्जन्सी लँडिंगमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, हवामाना बदलांवर त्वरित निर्णय घेण्याचे हे आता महत्वच झाल आहे . विमानतळ प्रशासन आणि पायलटने योग्य वेळी दक्षता घेतल्याने गडकरींच्या सुरक्षेची खात्री पटली आहे.

Source: Aaj Tak केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के विमान की गया में इमरजेंसी लैंडिंग

राष्ट्रीय घडामोडींचे ताज्या अपडेट्ससाठी दररोज भेट द्या लोकबातमी आपल मराठी न्युज पोर्टल…

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile