सीईटी अभियांत्रिकी प्रवेशाला सुरुवात! यंदा चार फेऱ्या, फार्मसी वेळापत्रक मात्र प्रतीक्षेत

Updated On:

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (Engineering) अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षेचा निकाल १६ आणि १७ जून २०२५ रोजी जाहीर झाला. निकाल लागून आत्तापार्येंत तब्बल १३ दिवसांनी, म्हणजेच शनिवारपासून (२८ जून) अखेर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. परंतु आपण जर फार्मसी डिपार्टमेंट कडे पहिले तर आपल्याला यामधील प्रवेशाचे कोणते हि वेळापत्रक आत्तापार्येंत जाहीर करण्यात आलेले नाही, ज्यामुळे फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2025 यंदाचे महत्त्वाचे बदल

Engineering Selection Process 2025 महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ह्यावेळेसच्या २०२५ प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जसे कि मागील वर्षी फक्त ३ फेऱ्या घेण्यात आल्या होत्या, पण ह्यावेळेस आता ऐकून ४ फेऱ्या राबवण्यात येणार आहेत. हे बदल विद्यार्थ्यांच्या हितासाठीच करण्यात आले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध होतील.

Engineering Selection Process Maharashtra 2025: ह्यावेळेसच्या फेऱ्यांचे स्वरूप आपण जर पहिले तर यामध्ये पहिल्या फेरीदरम्यान विद्यार्थ्याला दिलेल्या पसंतीक्रमांमधून एक जागा मिळाली तर त्याचा अर्ज त्या जागेसाठी लॉक होई, परंतु जा कोणते हि कॉलेज नाही मिळाले तर तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतात, आता दुसऱ्या फेरीतील तीन पसंतींपैकी एक कॉलेज मिळाल्यास तुमचा अर्ज लॉक होईल. यानंतर तिसरी फेरी यामध्ये सहा पसंतींपैकी कोणतेही एक कॉलेज मिळाल्यास अर्ज लॉक होईल. आणि शेवटची चौथी फेरी यामध्ये संस्थात्मक म्हणजेच कॉउंसिलिंग फेरी होणार असून, यामध्येही गुणवत्ता यादी आधारे दिलेल्या कॉलेज ला निवड केली जाईल.

अभियांत्रिकी प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक Engineering Selection Process Timetable 2025

Engineering admission schedule 2025

प्रवेश प्रक्रियातारीख
ऑनलाइन अर्ज अंतिम तारीख८ जुलै २०२५
कागदपत्र पडताळणी९ जुलै २०२५
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर१२ जुलै २०२५
अर्जातील त्रुटी दुरुस्ती कालावधी१३ ते १५ जुलै २०२५
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर१७ जुलै २०२५

फार्मसी अभ्यासक्रमासाठी अजूनही प्रतीक्षा कायम

दरवर्षी प्रमाणे अभियांत्रिकी प्रवेशानंतर लगेच फार्मसी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर होते. मात्र यावेळी निकाल लागून १५ दिवस उलटूनही फार्मसी प्रवेशाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे फार्मसीसाठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे.

ई-सकाळ ला डॉ. एम. एस. कलशेट्टी, प्राचार्य, वि. गु. शिवदारे फार्मसी महाविद्यालय, सोलापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच फार्मसी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर होईल अशी अपेक्षा सरानी दर्शवली आहे.

2024 मागील वर्षातील संभ्रम कायम ?

२०२४ मध्ये प्रवेश शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या उशिरामुळे तब्बल ३४% अभियांत्रिकी जागा रिक्त राहिल्या होत्या मात्र ह्यावेळेस ते टाळण्यासाठी Engineering Selection Process 2025 मधील फेऱ्या जाहीर करण्याचा निर्णय सकारात्मक मानला जात आहे. परंतु फार्मसी अभ्यासक्रमाबाबत धोरण कधी लागू होईल याबाबत आणखी शंका दर्शवली जात आहे.

जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटला असेल, तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि ह्या बरोबर आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स अगदी वेळेत मिळतील. धन्यवाद!

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile