Tulsi health benefits: आपल्या अंगणात असलेली तुळस आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. तुळशीच्या पानामध्ये असणारी औषधी ज्यामध्ये विशेतः अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आपले शरीर नोरोगी ठेवण्यास महत्वाचे असून तुळशीपासून अनेक आजार दूर राहू शकतात ते कसं आज आपण या पोस्ट मध्ये Tulsi medicinal uses जाणून घेणार आहे.
ताणतणाव कमी करण्यास मदत
Tulsi Benifits: तुळशीमुळे आपल्या शरीरातली साखर नियंत्रित राहते, कारण तुळशीमधील नैसर्गीक गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुळशीचे रोज सकाळी पाणी पिल्याने मानसिक शांतता ही मिळते, मनही शांत राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पचन
Tulsi for digestion: तुळशीचे पाणी आपल्या पंचनसंस्थेसाठी देखील खूप महत्वाचे असते. अपचन, गॅसेस, किंवा सूज येणे यावर देखील तुळशीचे पाणी आराम देण्यास मदत करते. याचे दररोज सेवन केल्यास आपली अन्न पचविण्याची क्षमता वाढते.
हे ही वाचा: कमी वयात केस पांढरे होतायेत? जाणून घ्या कारणं आणि उपाय
सर्दी-खोकल्यावर उपाय
Tulsi for cough: जर आपल्याला सर्दी खोकला घशाचा त्रास इन्फेक्शन होत असेल तर तुलसी चा यावरदेखील फायदा होतो. यात असणाऱ्या नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्मामुळे आपला बचाव होतो, तसेच श्वसनाचा त्रास होत असेल तर त्यावर आराम मिळण्यासाठी तुळशीचे पाणी प्या त्यामुळे आपल्याला खूप आराम मिळू शकतो.
Tulsi for weight loss
वजन खूप वाढलं असेल तर त्यासाठी तुळशीची पान खूप फायद्याचे ठरतात. यामध्ये शरीरातील चरबी कमी होते आणि मेटाबॉलिझम वाढते त्यासाठी रोज सकाळी तुळशीचे पान पाण्यात उकळून पिल तर आपल वाढलेलं वजन नियंत्रणात यायला खूप मदत होते. आणि त्याचा स्किन ला पण खूप फायदा होतो.
Tulsi for skin
त्वचेसाठी face pack: तर निरोगी शरीराबरोबर निरोगी त्वचा पण सर्वांना हवी असते त्यासाठी तुळशीची काही पाने, थोडी हळदी पावडर आणि थोड गुलाबजल ह्याची पेस्ट करून चेहऱ्याला लावली तर त्याने आपल्या स्किनवरचे डाग आणि स्किन चा काळेपणा देखील कमी होऊ लागतो.
तर अशाप्रकारे आपल्या अंगणातली तुळस आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.







