फक्त 21 दिवस हा ज्यूस प्या, चमकदार त्वचा आणि एनर्जीमध्ये बदल Healthy juice for skin and energy

Date:

Healthy juice for skin and energy: घरात बनवलेला हा नैसर्गीक ज्यूस घेऊन पहा आणि त्वचेत, एनर्जीत खूप फरक दिसायला वेळ लागणार नाही. 1 गाजर, 1 बीट, 2 लिंबू, 1 आंबे हळद, 2 आवळा या साहित्यापासून आपण त्वचेसाठी आणि एनर्जीसाठी ज्यूस कसा बनवायचा ते या पोस्ट मध्ये पाहू.

फक्त 21 दिवस हा ज्यूस सकाळी उपाशी पोटी घेतला तर तुम्हाला एनर्जी मिळेल सोबतच तुमची त्वचा पण तेजस्वी दागविरहित आणि हायड्रेट राहण्यास खूप मदत होईल.

Healthy juice for skin and energy recipe

अपल्याला हा ज्यूस बनवण्यासाठी बीट, गाजर, ओली आंबे हळद, आवळा आणि लिंबू हे साहित्य लागणार आहे. ह्यातलं बीट, गाजर, आंबे हळद ह्या तीन गोष्टींची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढून घेतल्यानंतर ते धुऊन घ्यायचं आहे त्याचबरोबर ते थोड बारीक चिरून घेऊन त्यात चिरलेला आवळा घालायचा आहे. यानंतर चिरलेल लिंबू पिळून हे सर्व साहित्य मिक्सर ला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक होत नसल्या त्यात तुम्ही थोड पाणी पण घालू शकता इतक की त्याची घट्ट पेस्ट बनेल. वाटून झाल्यानंतर त्याला चाळणीने गळून घेऊन त्यात अजून थोड पाणी टाकून थोड चवीसाठी मिठ टाकून त्याला बर्फाच्या ट्रे मधे घालून घ्यायचं आहे आणि आता हा तयार बर्फ रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास मधे 1 ते 2 क्यूब घेऊन त्यात पाणी टाकून आणि एक चमचा मध टाकून पिऊन घ्यायचं आहे.

हा ज्यूस तुम्ही रोज फ्रेश होऊन देखील पिऊ शकता. पण ज्याला रोज रोज करण शक्य नसेल त्यांनी असा स्टोअर करून फ्रिज मध्ये ठेवला तरी चालेल.

हे ही वाचा: Facial सारखा ‘ग्लो’ घरीच हवाय? घरच्या घरी नैसर्गिक फेशियल!

Healthy juice चे फायदे

Healthy juice for skin and energy benifits:

  • गाजर आपल्या त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो आणि आपल्या डोळ्यांसाठी पण अती उत्तम आहे.
  • बीट शरीरात हिमोग्लोबीन वाढते तसेच एनर्जी पण देते.
  • आंबे हळद सुज कमी करते आणि त्वचेसाठी टॉनिक च काम करते.
  • आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन C आहे जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • लिंबू मध्ये पण व्हिटॅमिन C असते जे त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.

हा ज्यूस 21 दिवस नक्की पिऊन पहा फरक नक्की जाणवेल.

Note: हा हेल्दी ज्यूस दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यावर जास्त फायदा होतो.

हेल्थ आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.