स्वयंपाक करताना ‘या’ 5 तेलांचा वापर टाळाच! आरोग्यावर होतो गंभीर परिणाम Harmful Cooking Oils

Date:

Harmful Cooking Oils: आजकालच्या या जीवनशैलीत अनेक लोक स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर करतात पण वापरण्यात येणाऱ्या खाद्य तेलांपैकी काही तेल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात त्याचे जास्त स्वयंपाकात उपयोग केल्याने आपल्याला आरोग्यविषयक अडचणी येतात. तर आजच्या या पोस्ट मध्ये आपण नेमकी कोणत्या तेलाचा वापर करायला पाहिजे याबदल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Harmful Cooking Oils

बऱ्याचदा आपण ‘हेल्दी’ समजत असलेली काही तेल दैनंदिन स्वयंपाकात वापरतो पण त्याची योग्य माहिती नसल्याने हेच आपल्या शरीरासाठी घातक असतात त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण अश्याच 5 खाद्य तेल बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहे.

सूर्यफूल तेल (Sunflower Oil)

सूर्यफूल तेलामध्ये जास्त प्रमाणात ओमेगा-6 फॅटी ॲसिड असत. जर आपण याला उच्च तापमानात गरम केले तर तेलाचे ऑक्सिडाइज होऊन हानिकारक ‘फ्री रॅडिकल्स’ तेलामध्ये तयार होते, जे प्रमुख्याने आपल्या पेशींना नुकसान पोहचवतात यासोबतच कमी वयामध्येच हृदयाचे विकार देखील होऊ शक्यतात.

सोयाबीन तेल (Soybean Oil)

सध्या सर्वच लोक सोयाबीन तेलाचाच वापर करतात, पण लक्षात असू द्या हे तेल रिफाइंड असल्याने यामध्ये ओमेगा-6 फॅटी ॲसिड असत जे शरीरात इन्फ्लमेशन वाढवतात. या तेलालाचा जास्त वापर केल्याने मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयविकार अश्या आजारांचा धोका Soybean Oil ने होतो.

कॅनोआ तेल (Canola Oil)

Canola Oil याला सर्वच ठिकाणी आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून ओळखल जात पण काहीवेळा उत्पादन प्रक्रिया करताना हायड्रोजनेशनमुळे ट्रान्स हे फॅट्सयुक्त होतं. आता हेच ट्रान्स फॅट्स आपले कोलेस्टेरॉल असंतुलन आणि हृदयाच्या आपल्या आरोग्यावर समस्या निर्माण करतात.

पाम तेल (Palm Oil)

पाम तेल मार्केट मध्ये स्वस्त दारात मिळत असल्याने पॅक अन्न पदार्थात हे तेल सर्वात जास्त वापरले जाते. पण यातील सॅच्युरेटेड फॅट डिरेक्ट धमन्याच ब्लॉक करू शकतात. या तेलाच्या पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्टेरॉल प्रमाण वाढून हृदय विकारांचा धोका जास्त प्रमाणात वाढतो.

मक्याचं कॉर्न तेल (Corn Oil)

कॉर्न तेलात देखील ओमेगा-6 फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जेव्हा हे तेल बनवले जाते तेव्हा रासायनिक सॉल्व्हेंट्सचा वापर यात करण्यात येतो जे आपल्या शरीरासाठी योग नाही. या तेलाने वजन जास्त होणे, जळजळ होणे किंवा मधुमेह सारखे गंभीर आजार या तेलाने होतात.

Harmful Cooking Oils आपल्या आरोग्याची काळजी घेत स्वयंपाकात तेलाचा कमीत कमी वापर करा. आपल्या दैनंदिन आहारासाठी योग्य तेलाची निवड करा किंवा या तेलांऐवजी जर तुम्ही तिळाचं तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईल यांचा वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर राहील त्यामुळे तंदरुस्त राहण्यासाठी योग्य तेलाची निवड अवश्य करा…

हेल्थ विषयी उपयुक्त महतीसाठी लोकबातमी पोर्टल ला दररोज भेट द्या..

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile