Bhakri health benefits: आपल्या महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ म्हणजे भाकरी. तर आज आपण पाहणार आहोत भाकरी खाण्याचे 7 महत्वाचे फायदे. भाकरी केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यासोबतच वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या भाकरीचे म्हणजे बाजरी, नाचणी आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये पोषणतत्व पण वेगळे असतात तर चला मग आज आपण सर्वात आधी पाहणार आहोत बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे.
बाजरीची भाकरी (Millet Bhakri)
Benefits of millet bhakri: महाराष्ट्रातील सर्वात आवडीची भाकरी म्हणलं तर बाजरीची भाकरीचा पहिला नंबर लागतो, बाजरीच्या भाकरी मध्ये भरपूर पोषणतत्वे असतात जस की झिंक, लोह, मॅग्नेशियम असे घटक असतात. त्यामुळे आपण रोज भाकरी खाल्ल्यास हिमोग्लोबीन ची पातळी सुधारते सोबतच अशक्त पणा येणे, थकवा येणे, दम लागणे यांसारखे आजार कमी होऊन शरीरास पोषण मिळते. बाजरीची भाकरी पचायल देखील हलकी असते.
नाचणीची भाकरी (Ragi Bhakri)
नाचणीच्या भरकरीचे तर खुपच महत्वाचे फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते ज्यामुळे आपले हाड आणि दात खूप मजबूत राहण्यास मदत होते. लहान मूल, वृद्ध व्यक्ती, महिलांसाठी देखील नाचणीची भाकरी विशेष फायदेशीर ठरते. कारण नाचणीमध्ये अँटिऑक्सिडंस्ट असतात जे शरीरातल्या पेशींसाठी खूप फायद्याचे असतात यामुळे ही भाकरीचा समावेश तुम्ही आहारात नक्की करा.
हे पण वाचा: Healthy शरीरासाठी काही खास टिप्स, जाणून घ्या उपाय!
ज्वारीची भाकरी (Sorghum Bhakri)
Jowar Bhakri सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते कारण त्यामध्ये असलेल फायबर पचनसंबंधी समस्या दूर करण्यास मदत करत. ज्वारीच्या भाकरीत असणारे घटक हृदयाच्या आरोग्यास खूप फायदेशीर ठरत आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करत. यात तेलाचा वापर नसल्याने थोड्या तुपासह ती खाल्ली जाते म्हणून पचायला देखील हलकी असते.
भाकरी खाणे आपल्या शरीरासाठी कधीही चांगले
- बाजारात मिळणाऱ्या ब्रेड किंवा मैद्याच्या पदार्थांपेक्षा भाकरी कधीही चांगली.
- पोळी फुलके खायला पाहिजेच पण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भाकरी फार उपयुक्त ठरते.
- भाकरी ने पोट खूप वेळ भरलेले राहते आणि शरीराला ताकत वाढवायला पण मदत करते.
महाराट्रात जवळपास सर्वांनाच भाकरी आवडते त्यामध्ये चुलीवरची भाकरी म्हणले की सगळ्यांनाच खावी वाटते कारण त्याची वेगळीच चव लागते त्यात वेगळाच गोडवा असतो पण जे शहरी भागात राहतात ते याकडे दुर्लक्ष करत पण लक्षात असू द्या जर नियमित भाकरी खाल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहते.






