Rajinikanth Coolie Box Office Collection: सुपरस्टार राजनीकांतची आजही जादू कायमच आहे. 74 वर्षीय सुपरस्टार आजही सर्वांचे मन जिंकत रेकॉर्डस् देखील मोडत आहे. सध्या नुकताच काल 15 ऑगस्टला 2025 ला आलेला चित्रपट ‘कुली’ (Coolie) पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत असून चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली आहे.
Coolie कुली चित्रपटाने जगभरातून पहिल्याच दिवशी तब्बल 170 कोटींची कमाई करत तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नवा विक्रम केला. एकाच दिवसात ही आत्तापार्येंतची सर्वात मोठी ओपनिंग असल्यामुळे रजनीकांत यांचे चाहते जल्लोष करत चांगलाच प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे.
कुली मध्ये रजनीकांत यांची जबरदस्त भूमिका
लोकेश कनगराज यांच्या द्वारे दिग्दर्शित ‘कुली’ (Coolie) चित्रपटात रजनीकांत यांनी भ्रष्टाचार विरोधात कुलीची भूमिका केली असून त्यांची ऍक्शन आणि भावनिक टच लोकांचा मनात वेगळेच घर करून आहे.
Rajinikanth New Movie: ‘कुली’ हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील 171 वा चित्रपट असून, त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होत असून त्याना चित्रपट पाहण्यासाठी आजही लोक आतुरतेने वाट पाहता, हेच यश पुन्हा हे रेकॉर्ड सिद्ध करत आहे.
Coolie Box Office Collection
कुली चित्रपटाने पहिल्याच दिवशी 170 कोटींची कमाई केली, आणि आता दुसऱ्या दिवशी देखील आत्तापार्यें 200 कोटींचा टप्पा पार झाला असून आज बोककिंग करण्याची occupancy rates 80% चेन्नई आणि बेंगळुरू मध्ये आहे यामुळे आजच हा चित्रपट 300 कोटी पार करेल का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सुपरस्टार आणि आमिर खानची एंट्री
या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत सौबिन शाहिर, उपेंद्र, श्रुती हासन, सत्यराज आणि नागार्जुन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे आणि खास गोष्ट म्हणजे बॉलिवूडचे स्टार आमिर खान यांनी पण यामध्ये विशेष भूमिका केली आहे. यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाची प्रसिद्धता आणखी वाढली.
‘कुली’ Coolie चित्रपट चे निर्माता सन पिक्चर्स असून याचे वितरण पेन स्टुडिओजकडून करण्यात येत आहे.
हृतिक रोशनचा ‘वॉर 2’ मागे
एकाच दिवशी प्रदर्शित झालेला हृतिक रोशनचा ‘वॉर 2’ (War 2) पिच्चर मात्र कुली च्या यशामुळे मागे पडला, War 2 पहिल्याच दिवशी 52.50 कोटींची कमाई केली आहे. हा लॉन्ग वीकएंड असल्यामुळे या चित्रपटाला आणखी पर्तिसाद मिळू शकतो आणि पुढील काही दिवसात मोठी कमाई करू शकतो पण Coolie ला मिळालेल्या प्रतिसादामुळे या चित्रपटाला चांगलीच कठीण स्पर्धा करावी लागेल.






