‘चला हवा येऊ द्या २’ मधून निलेश साबळे बाहेर! सूत्रसंचालन ‘या’ अभिनेत्याकडे Chala Hawa Yeu Dya Anchor Change

Date:

Chala Hawa Yeu Dya Anchor Change: मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेला Zee Marathi चा लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ आता ‘सीझन २’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा शो तब्बल २ वर्षांच्या विश्रांतीनंतर झी मराठीवर वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे, मात्र ह्या वेळेस एक मोठा बदल सर्वांना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे निलेश साबळे हा शो होस्ट करणार नाही! मग आता सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे कि ह्या कार्यक्रमात आता कोण-कोण दिसणार आहे आणि नवी टीम कशी असणार आहे हेच आपण पाहणार आहे.

झी मराठी वर पुन्हा चला हवा येऊ द्या! पण निलेश दिसणार नाही…

‘चला हवा येऊ द्या’ आणि निलेश साबळे हे समीकरण इतकं घट्ट होतं की त्याच्या अनुपस्थितीत हा शो चालू होईल का नाही ह्याला कसा प्रतिसाद मिळेल याची आतापर्येंत हे ठरवणे ही कठीण होत. दिग्दर्शक ह्याचबरोबर सूत्रसंचालक आणि नेहमीच निर्मात्याची भूमिका बजावत निलेशने हा शो यशाच्या शिखरावर नेला यात त्याचे योगदान देखील महत्वाचे आहे त्याचबरोबर ह्या success मागे त्याचा खूप वाटा आहे.

मात्र, शो बंद झाल्यानंतर निलेश हा कलर्स मराठीवरील ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये दिसू लागला ह्याच दरम्यान झी मराठीसोबत त्याचे मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि आता तेच आपल्याला पाहण्यास देखील मिळत आहे. आता जो Chala Hawa Yeu Dya Season 2 येत आहे त्यामध्ये निलेश साबळे दिसणार नाही…

‘चला हवा येऊ द्या’ नवा सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकर

झी मराठी वाहिनीने आता सर्वात मोठा निर्णय घेत ‘चला हवा येऊ द्या २’ ची संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिजीत खांडकेकर याच्याकडे सोपवली आहे.

Chala Hawa Yeu Dya Anchor Change

Abhijeet Khandkekar
Abhijeet Khandkekar

अभिजीत खांडकेकर एक प्रेक्षकप्रिय अभिनेता ह्याचबारोबर अनेक पुरस्कार सोहळ्यांचा अनुभव व दमदार निवेदन शैली याचा वेगळा फॅन बेस त्याचा आहे. खूप लोकप्रिय अभिनेता म्हणून देखील त्याला ओळखले जाते आणि ही संधी ने त्याचा फॅन्स मध्ये आणखी उत्सहा आणलेला दिसून येत आहे.

झी मराठीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता, नव्या स्वरूपात हा शो सादर करण्यासाठी एक नवीन चेहरा हवा होता, आणि अभिजीत ही भूमिका जबरदस्त निभावेल याचा त्यांनी अंदाज बांधला आहे.

दिग्दर्शक व लेखक टीममध्येही नव्या चेहऱ्याचा समावेश

चला हवा येऊ द्या सीझन २ या मध्ये निलेश केवळ सूत्रसंचालकच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही नसणार आहे. त्याच्या जागी आता ३ नवीन दिग्दर्शकाना जबाबदारी दिलेली आहे यात प्रियदर्शन जाधव, अमोल पाटील आणि योगेश शिरसाट यांचा समावेश केला आहे.

चला हवा येऊ द्या टीम मधील लेखक मंडळातही नवीन भर पडली असून आता त्यात अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, पुर्णानंद वांडेकर आणि पुर्णानंद वांडेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

हास्यवीरांची नवी टीम सीझन २ नव्याने सजली

‘चला हवा येऊ द्या सीझन २’ मध्ये काही जुनी आणि काही नवी हास्य कलाकारांची विनोदी टीम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यात श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे आणि नव्याने सामील होणारा गौरव मोरे याची अभिनयशैली या शोमध्ये नवीनच चैतन्य आणण्याचे संकेत देत आहे.

‘चला हवा येऊ द्या २’ शो कधी सुरु होणार

Zee Marathi वरील या नव्या सीझनचा प्रसारन साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच प्रसारित होणार असल्याची माहिती आहे.

‘चला हवा येऊ द्या २’ ही केवळ एक मनोरंजनाची शो नाही, तर झी मराठीची नवीन दिशा ह्यातून दिसत येत आहे. आता निलेशच्या अनुपस्थितीत शो यशस्वी होईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र, अभिजीत खांडकेकरसारखा दमदार सूत्रधार आणि गौरव मोरेसारखा हास्यवीर यांची जोड निश्चितच काहीतरी भन्नाट घेऊन येणार आणि सर्वाना पुन्हा हसवणार याची उत्सुकता सगळेच पाहत आहे.

झी मराठीवरील सर्व नवीन शो लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच भेट द्या www.LokMarathi.com

Source: Zee News ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile