रात्रभर अभ्यास करताय? मग हे वाचाच! ‘या’ 4 सवयींनी अभ्यासात होईल जबरदस्त सुधारणा! Night study tips in Marathi

Updated On:

Benefits of night study: रात्र म्हणजे शांतता आणि अभ्यासासाठी योग्य वेळ! सर्वच विद्यार्थींसाठी सकाळी लवकर उठणं शक्य नसलेल्या अनेक जण रात्र हाच अभ्यासाचा सर्वात चांगला पर्याय ठरवतात. पण या वेळी अभ्यास योग्य पद्धतीने न केला तर आपला वेळ वाया जाण्याची शक्यता असते. म्हणूनच, आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून चार सोप्या प्रभावी सवयी पाहणार आहोत ज्या तुमच्या रात्रीच्या अभ्यासात निश्चितच सुधारणा करतील.

Night study tips in Marathi स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी उपयुक्त!

1. चांगली झोप

तुम्ही पण रात्री अभ्यास करता का? तर लक्षात असू द्या दिवसा कमीत कमी आपण 6-7 तासांची शांत झोप घेणं आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे. झोप अपुरी राहिल्यास प्रामुख्याने थकवा, डोळ्यांवर ताण आणि एकाग्रतेचा सामना आपल्यला करावा लागतो पण जर झोप पूर्ण असल्यास मेंदू ताजातवाना चांचलित राहतो व अभ्यास एकाग्रतेने मन लावून होतो. जरी परीक्षा जवळ आलाय, तरी चांगली झोप घ्या कारण जास्त अभ्य्सापक्ष मन लावून केलेलाच अभ्यास लक्षात राहतो.

2. कॉफी किंवा ग्रीन टीचा वापर

रात्रीवेळी अभ्यास करताना झोप येणे सामान्य बाब आहे पण झोपेवर मात करण्यासाठी कॉफी किंवा ग्रीन टी हे उत्तम पर्याय आहे. कॉफी मध्ये असलेले कॅफिनमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आपला मेंदू सतर्क राहण्यास मदत होते. हे ही लक्षात असुद्या जर आपण जास्त प्रमाणात कॉफी गघेतली तर आपले झोपेचं चक्र बिघडू शकते म्हणून दिवसात 1-2 कप पुरेसे आहेत.

3. योग्य प्रकाश / लाईट

रात्री अभ्यास करताना प्रकाशाचं योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त टेबल लॅम्प किंवा छोटा लाइट टाळा यासोबतच रूम अंधारात ठेऊ नका. जास्त प्रमाणात अंधार असल्याने डोळ्यावर प्रेशर वाढते आणि झोप येण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी खोलीमध्ये सारख्याच प्रमाणात प्रकाश असावा. अभ्यास करताना प्रकाश थेट पुस्तकावर पडणं गरजेचं आहे, यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही आणि अभ्यासाची गुणवत्ता वाढते.

4. बेड वर अभ्यास टाळा

अभ्यास बेड वर टाळा याने शरीर सुस्त होतं आणि झोप येते. अभ्यासासाठी एक स्वतंत्र टेबल आणि खुर्ची वापरा. बसताना पाठ कायम सरळ ठेवा. दर ३०-४० मिनिटांनी थोडं चालणं, शरीराला स्ट्रेचिंग करणं यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही सक्रिय राहतो.

रात्रीचा अभ्यास फायदेशीर ठरतो, पण त्यासाठी योग्य सवयी असणे गरजेचे आहे. पण हे ही लक्षात असुद्या झोपेची पूर्णता ही प्राथमिक गरज आहे.

Benefits of night study वरील चार सवयी नियमित केल्यास रात्री अभ्यासात मोठी सुधारणा होईल. या चार सवयी तुमच्या एकाग्रतेला आणि अभ्यासात सातत्य मिळवण्यासाठी योग्यच ठरेल.

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

स्टडी टिप्सस आणि करिअर मार्गदर्शनासाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या

Source Quora: Is it scientifically correct to study at night?

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile