Q5. 2025 मधील पार पडलेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खालीलपैकी कोण विजयी झाला?
६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोण विजयी झाला
2025 मधील अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरला. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 वादात का सापडली?
अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला, तर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडला मिळाल्याने सामना बरोबरीत गेला. मात्र तिसरा पॉईंट मोहोळच्या खात्यात जमा झाला. यावर आक्षेप घेत महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि मैदान सोडून गेला. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले.
पारितोषिक वितरण
पृथ्वीराज मोहोळला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
👉 लक्षात ठेवा: ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोण विजयी झाला? याचे उत्तर आहे – पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला.
