Perplexity AI Google Chrome सिलिकॉन व्हॅली: अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी Perplexity AI चे संस्थापक अरविंद श्रीनिवास यांनी थेट गूगल क्रोम ब्राउझर खरेदी करण्यासाठी तब्ब्ल $34.5 अब्ज डॉलरची ऑफर दिली, यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात याबद्दल खूपच चर्चाना उधाण आलेले दिसून येत आहे. एआय स्टार्टअप Perplexity ने थेट Google च्या Chrome या लोकप्रिय वेब ब्राउझर साठी ही ऑफर दिली आहे.
Chrome मध्ये $3 अब्ज गुंतवणुकीचे आश्वासन
Perplexity offers to buy Google Chrome: Perplexity चे व्यवसाय अधिकारी Dmitry Shevelenko यांनी सांगितले की, जर गूगल ने खरेदी पूर्ण केल्यास, Perplexity पुढील दोन वर्षांत Google Chrome ब्राउझर आणि त्याचा ओपन-सोर्स सॉफ्टवेअर Chromium प्रकल्पात ते $3 अब्जांची गुंतवणूक करेल आणि Chrome च्या टीममधी आणखी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल.
Google विकणार ब्राउझर साम्राज्य?
The Wall Street Journal आणि Bloomberg च्या अहवालानुसार, Perplexity ने दिलेली ही ऑफर पूर्णपणे वित्तपुरवठा करण्याची तयारी आहे परंतु Google कडून अद्याप Chrome ब्राउझर विकण्याची कोणतीही इच्छा दिसत नाही याचबरोबर गुगल ला कोणत्याही न्यायालयाने विक्रीचा आदेश देखील दिलेला नाही. या आधी पण Perplexity ने अमेरिकेत TikTok ऑपरेशन्स खरेदी करण्याचाही प्रयत्न केला होता पुढे चालून तो अडकला आणि तत्यावर कोणतीही डील त्यांनी केली नाही.
Perplexity AI मूल्यमापनापेक्षा दुप्पट ऑफर
Perplexity या कंपनीने एनव्हिडिया आणि सॉफ्टबँकसह गुंतवणूकदारांकडून जवळपास 1 अब्ज डॉलर उभारले असून यावर कंपनीचे मूल्यांकन $14 अब्ज डॉलरच्या आहे. म्हणजे आता त्यांनी Google Chrome ब्राउझर ला जेवढी ऑफर दिली आहे तेवढे तर कंपनीचे मूल्यांकन पण नाही.
Perplexity AI Google Chrome
Perplexity offers to buy Google Chrome: गूगल चे CEO सुंदर पिचाई याना क्रोम खरेदी करण्यासाठी Perplexity ने ऑफर दिली त्यामध्ये कंपनीचा दावा आहे की अनेक फंडांनी या डीलसाठी पूर्णपणे निधी पुरवणार असून कंपनीने त्याआधीच हा ऑफर दिला आहे. परुंतु Perplexity ने यामध्ये कोणत्याही नावाचा उल्लेख स्पष्टपणे केलेला नाही.
गूगलवर कश्याचा दबाव?
गूगल मध्ये Regulatory Pressure चा दबाव दिसून येत आहे. अमेरिकेचे न्याय विभाग ऑनलाइन सर्चमधील बेकायदेशीर मक्तेदारीच्या एका न्यायालयीन निर्णयावर उपाय शोधतअसून मिळालेल्या माहितीनुसार एका उपायांमध्ये गूगलला क्रोम विकण्यास भाग पाडण्याचा याती समावेश आहे. पण यामध्ये कंपनीकडे अपील करण्याचा ऑपशन असून कंपनीला ब्राउझर विकण्याचा कोणताही इरादा दिसत नाही.
मागील वर्षी U.S. District Judge Amit Mehta’s यांनी दिलेल्या निकालाप्रमाणे Google illegally monopolised the search market असा उल्लेख केला होता. गूगलने आता याच निर्णयाविरोधात अपील करत, न्यायाधीश या महिन्यात निकाल देणार अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. क्रोमची बब्राउर ची विक्री करण्यास भाग शक्यतांच्या बाहेर असला तरी, Perplexity ने यातून संधी साधल्याचे स्पष्ट दिसत आहे.







