अनिल अंबानींना SBI चा मोठा धक्का, रिलायन्स कम्युनिकेशन्स ‘फ्रॉड’ श्रेणीत Anil Ambani vs SBI

Updated On:

Anil Ambani vs SBI: भारतातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकेने आता रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) या कंपनीच्या ऐकून तब्ब्ल ३१,५८० कोटी कर्ज खात्याला ‘धोखाधडीची व फसवणूक श्रेणी’ दिली आहे. यासोबतच, या कंपनीचे माजी संचालक अनिल अंबानी यांचे नाव थेट भारतीय रिझर्व्ह बँकेला रिपोर्ट करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे.

कधी जगातील ६ सर्वात श्रीमंत वक्ती ते आज ‘फसवणूक’ या टॅगखाली, रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या माध्यमातून झळकलेले अनिल अंबानी आता फ्रॉड आणि बनावट हमीपत्रे यासारख्या आरोपांमुळे सध्या चर्चेत आहेत. State bank of India च्या कारवाईनंतर त्यांच्या या बिझनेस वर संकटाचे सावट पसरलेले आहे.

RCom Loan ची फसवणुक, SBI ची अधिकृत माहिती

RCom Loan Scam: २३ जून २०२५ रोजी एसबीआयकडून एका पात्राच्या माध्यमातून दिलेल्या कर्जाच्या वापरण्यामध्ये आणि परत फेडण्यामध्ये अनियमितता आढळल्याची नोंद बँकेने दिली आहे. बँकेच्या ‘धोखाधडी ओळख समिती’ने कर्ज वापराबाबत अनेक नियम तोडल्याचे ह्यामध्ये स्पष्ट केले आहे.

RCom कर्ज प्रकरण Anil Ambani vs SBI

फसवणूक प्रकरण: SBI ने Reliance communications कंपनी ला एकूण ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या वापराची चौकशी करताना SBI ला अनेक स्तरांवरील आर्थिक बनावट यामध्ये दिसली, आणि याच कारणामुळे आता हे त्यांचे कर्ज खाते थेट फसवणुकीच्या वर्गात टाकले जाणार आहे.

अनिल अंबानी यांच्यावर आर्थिक संकट

SBI ने अनिल अंबानी यांनाही पत्राची एक प्रत दिली आहे. RBI च्या नियमानुसार, प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे नाव थेट केंद्रीय बँकेला रिपोर्ट करून द्यावे लागते. यामुळे अनिल अंबानी यांच्या आर्थिक व्यवहारांवर तसेच क्रेडिट स्कोअरवर आणि भविष्यातील आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

बँकिंग पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा निर्णय

फ्रॉड प्रकरण केवळ अनिल अंबानी Reliance communications कंपनीपुरते मर्यादित नाही, तर भारतातील सर्वच कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि बँकिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण जबाबदारी यावर लक्ष वेधणारे ठरत आहे. अनेक आर्थिक विश्लेषकांच्या मते आता इतर बँकाना ह्यामाध्यमातून निर्णय समजण्यास मदत होईल.

RCom Loan Scam: अनिल अंबानी यांच्यासाठी ही कारवाई जरी एक मोठा धक्का असला, तरी बँकिंग व्यवहारातील हा पारदर्शकतेच्या दिशेने घेतलेले महत्त्वाचा टप्पा मनाला जात आहे.

देश-विदेशातील आर्थिक, राजकीय आणि कॉर्पोरेट विश्वातील अचूक बातम्यांसाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या.

टाइम्स ऑफ इंडिया – SBI flags Anil Ambani’s RCom loan a/c as frau

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile