12% GST स्लॅब रद्द होणार? AC, ट्रॅक्टर सह या वस्तू होणार स्वस्त GST Council Meeting 2025

Date:

GST Council Meeting 2025: देशातील सर्वसामान्य लोकांसाठी GST संदर्भात सर्वात मोठी बातमी, येत्या दोन आठवड्यांत जीएसटी काउंसिलची मीटिंग होणार असून यामध्ये GST कर स्लॅब मध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या मीडियात आलेल्या माहितीनुसार 12 टक्के जीएसटी स्लॅब पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

12% स्लॅब बंद होण्याची शकयता

सध्या 12% टक्के स्लॅब मध्ये असलेल्या वस्तू आणि सेवा हे 5 टक्के किंवा 18 टक्के स्लॅब मध्ये हलवले जाण्याची दाट शक्यता असून यामध्ये विशेषतः AC, ट्रॅक्टर आणि विमा यांवर कर कमी होऊन त्या स्वस्त होण्याची शक्यता आहे.

आता एसी आणि ट्रॅक्टर खरेदी होईल फायदेशीर?

ट्रॅक्टर सध्या 12% GST स्लॅबमध्ये येतो, जर तो 5% स्लॅब मध्ये आला तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. याचप्रमाणे एअर कंडिशनरवर सध्या 28% कर लावला जातो यावर कर कमी करण्याचा विचार सुरु असून यामुळे हे पण स्वस्त होणार आहे. याचप्रमाणे घरातील बहुतांश सामनावरील कर कमी होऊन ते खरेदी कारण सोप होईल.

हे पण वाचा : प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना! तरुणांना मिळणार 15 हजार रुपये

विमा योजनांवर फायदा

12 percent GST slab removal: 12% स्लॅब कमी झाल्यास विमा क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

  • सध्या टर्म इन्शुरन्सवर 18% जीएसटी लावला जातो.
  • हे फक्त 5% पर्यंत आणणार असल्याचा प्रस्ताव सरकार विचारात घेत आहे.
  • विमा कंपन्यांना इनपुट क्रेडिटचा दावा करण्याचीही मुभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

GST रोडमॅप GST Council Meeting 2025

जीएसटी लावल्यानंतर राज्यांना महसुलात झालेला तोटा कव्हर करण्यासाठी भरपाई उपकर लावला होता आत तो येत्या मार्च मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्या जागी शासन आरोग्य कर किंवा स्वच्छता कर लावू शकत.

चार चाकी कार किंवा SUV वर लावलेला कर मात्र जसाच्या तसा राहण्याची शक्यता असून कारच्या किमतीत फारसा बदल नाही होणार.

जर 12% GST स्लॅब रद्द झाल्यास एसी, ट्रॅक्टर, विमा यांसारख्या वस्तू व सेवा कर खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे GST Council Meeting महत्वाची ठरणार आहे.

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile