महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ले जागतिक पातळीवर, युनेस्कोच्या यादीत थेट समावेश! Shivaji Maharaj Forts UNESCO

Updated On:

Shivaji Maharaj Forts UNESCO: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे साक्षीदार असलेले हे १२ ऐतिहासिक किल्ले आता जगाच्या यादीत ठळकपणे उमटले आहेत. युनेस्कोने नुकतेच या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला असून, ही महाराष्ट्रासाठी आणि आपल्या भारत देशासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!

Shivaji Maharaj UNESCO Forts List कोणते आहेत हे १२ किल्ले?

Shivaji Maharaj Forts UNESCO

या यादीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश केलागेला आहे. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अत्यंत महत्त्वाचे ठरले होते आणि आता हे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत म्हणजेच जागतिक पातळीवर नमूद झाले आहे.

UNESCO युनेस्को म्हणजे काय?

UNESCO म्हणजे United Nations Educational, Scientific and Cultural Organization. ही संयुक्त राष्ट्रांतर्गत संस्था आहे जी शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संवादाच्या माध्यमातून जगभर शांतता प्रस्थापित करण्याचे काम करते.

युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस (फ्रान्स) येथे असून सध्या या संस्थेचे १९४ सदस्य देश आणि १२ सहकारी सदस्यांचा समावेश आहे.

जागतिक वारसा यादीत समावेश का केला जातो?

युनेस्को मार्फत जगातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्वाच्या ठिकाणांची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी युनेस्को दरवर्षी काही ठिकाणांचा म्हणजेच World Heritage Sites यांचा समावेश करते. कोणतेही स्थळ या यादीत यायचे असल्यास त्यात “अद्वितीय वैश्विक मूल्य जयला आपण इंग्लिश मध्ये Outstanding Universal Value असे म्हणतो” असणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले याच निकषांवर योग्य ठरले आहेत.

शिवकालीन किल्ल्यांचे महत्त्व

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील हे १२ किल्ले केवळ वास्तू नव्हे तर स्वातंत्र्याची भावना आणि मराठी अस्मितेचे महत्वाचे प्रतीक आहेत. यामध्ये रायगड ही राजधानी, तर प्रतापगड व पन्हाळा यांसारखे गड लढाया आणि पराक्रमाची साक्ष देतात.

शिवाजी महाराजांचे हे किल्ले फक्त महाराष्ट्राचेच नव्हे, तर आता संपूर्ण जगाचे सांस्कृतिक वैभव आहेत. युनेस्कोच्या जागतिक यादीत Shivaji Maharaj Forts UNESCO समावेश हा मराठी अभिमानाचा विजय आहे. UNESCO World Heritage Site यादीत या किल्यांच्या समावेश झाल्याने संरक्षण अधिक सक्षम होणार असून पर्यटनालाही आता आणखी चालना मिळेल.

Source: World Heritage Convention UNESCO

महारष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी दररोज भेट द्या LokMarathi.com

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile