Uddhav-Raj Thackeray Marathi Bhasha Vijayi Melava: आज मराठी भाषा विजयी मेळावा हा मुंबईच्या वरळी परिसरात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळाले आणि याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे लागले.
मराठी भाषा विजयी मेळाव्यात राज ठाकरे निळ्या मफलरसह नव्या लूकमध्ये दिसले. त्यांच्या याच स्टाईलने सर्वां महाराष्ट्राचे लक्ष वेधले पण ह्यामधून त्यांना नेमकी कोणता संकेत देण्याचा प्रयत्न केला? जाणून घ्या सविस्तर.
मराठी भाषेसाठी एकत्र आले ठाकरे बंधू
3 जुलै 2025, मराठी भाषा विजयी मिळाव्यानिमित्त वरळी परिसरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावर आले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी वेधले. आजचा होणार हा मेळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र महारष्ट्र नवनिर्मा सेने या दोन्ही पक्षासाठी महत्वाचा मानला जात आहे. कित्येक वर्षांतर हे दोघे भाऊ आणि दोन्ही गट यात एकत्र आपल्याला पाहायला मिळाले. आजचा हा मेळावा मराठी भाषेची सक्ती विरोधात मिलेल्या यशचा होता.
राज ठाकरे ‘निळ्या मफलर’मध्ये, गॉगल लूकने मंचावर हजर
राज ठाकरे जेव्हा व्यासपीठावर दाखल झाले, तेव्हा त्यांच्या खांद्यावर निळ्या रंगाचा चमकदार मफलर, डोळ्यांवर गॉगल आणि साधा पांढराशुभ्र कुर्ता असा आतापर्यतचा त्यांचा हा वेगळाच अंदाज होता. हा लूक त्यांच्या भगव्या पोशाखांपासून संपूर्ण वेगळा होता. त्याचा हाच ‘नवा लूक – नवा संदेश आहे का?’ असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
अमित ठाकरेही निळ्या शर्टमध्ये; योगायोग?
Marathi Bhasha Vijayi Melava या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेही आज निळ्या रंगाचाच शर्ट मध्ये दिसले. यामुळे हा दलित समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न आहे कि काय? असा राजकीय प्रश्न उपस्थित होतो आहे.
राज ठाकरे काय म्हणाले? Marathi Bhasha Vijayi Melava
राज ठाकरे म्हणाले, ‘माझ्या मराठीकडे आणि मराठी माणसाकडे कुणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही. जे २० वर्षे झालं नाही आणि जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं. आम्ही दोघे भाऊ एकत्र दिसावेत, हे मराठी माणसाला वाटत होतं, ते आज झालं’ ही वक्तव्यं स्पष्टपणे मराठी एकतेचा संदेश देणारी होती.
Marathi Bhasha Vijay Diwas 2025 या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर यांच्यासह अनेक मुख्य नेते उपस्थित होते.
राजकीय विश्लेषक काय म्हणतात? राज ठाकरे निळा रंग परिधान करून दलित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. निळा रंग हा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतीकात्मक रंग मानला जातो. त्यामुळे यामागे एक ठोस राजकीय विचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय क्षेत्रातील बातम्यांसाठी भेट द्या दररोज भेट द्या LokMarathi.com
Source: YouTube ABP Majha







