बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 2500 जागांसाठी भरती सुरु Bank of Baroda Bharti 2025

Date:

Bank of Baroda Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाकडून एक सुवर्णसंधी म्हणजेच नौकरी जाहिरात जाहीर झाली आहे. देशातील नामांकित सरकारी बँकांपैकी एक असलेल्या Bank of Baroda अंतर्गत Local Bank Officer (LBO) पदांसाठी तब्बल २५०० जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २४ जुलै २०२५ पर्यंत भरती अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांना BOB च्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणारआहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया कश्याप्रकारे असेल, उमेदवारांना किती पगार काय असेल? यावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ४ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही २४ जुलै २०२५ पर्येंत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी ज्या राज्यात फॉर्म भरला असेल त्यांना त्या राज्यात पोस्टिंग दिले जाईल.

बँक ऑफ बडोदा भरती पात्रता आणि शैक्षणिक अट

Bank of Baroda Job Vacancy 2025: स्थानिक बँक अधिकारी म्हणजेच LBO या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने IDD धारकांचा देखील समावेश केला आहे यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सारख्या व्यावसायिक कोर्से पात्रता देखील भरतीसाठी ग्राह्य धरल्या जातील. उमेदवारांकडे अनुसूचित दिलेल्या व्यावसायिक बँका किंवा प्रादेशिक गामीण बँकेमध्ये किमान १ वर्षाचा अधिकारी या पदाचा अनुभव असणे बंधनकारक असणार आहे.

महत्वाचे उमेदवारांनी नॉर्थ घ्यावी कि NBFC, सहकारी बँका, लघुवित्त बँका, फिनटेक किंवा ऑनलाईन पेमेंट बँकांचा अनुभव ह्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच उमेदवाराला अर्ज करत भरलेल्या राज्यातील स्थानिक भाषेचे वाचन, लेखन आणि भाषा समजणे आवश्यक आहे.

Bank Of Baroda LBO Job Vacancy 2025 Notification PDF
Bank Of Baroda LBO Job Vacancy 2025 Notification PDF

अर्ज प्रक्रिया Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda मध्ये Local Bank Officer (LBO) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Careers’ टॅब वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करताना वैध ईमेल आणि चालू मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. अर्ज भरल्यावर अर्जाची प्रत व शुल्काची पावती तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी फाईल मध्ये साठवून ठेवा.

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: २४ जुलै २०२५

निवड प्रक्रिया आणि परीक्षा

Bank of Baroda Bharti 2025 निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश असेल:

  1. ऑनलाइन परीक्षा (४ विषय – इंग्रजी, बँकिंग ज्ञान, सामान्य ज्ञान आणि गणित)
  2. मानसोपचार मूल्यांकन
  3. मुलाखत (Interview)

ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक वविषयात ३० प्रश्न असणार आहे म्हणजे एकूण १२० प्रश्न असतील. प्रत्येक विषयासाठी ३० मिनिटांचा कालावधी असेल. सामान्य/EWS उमेदवारांसाठी किमान ४०%, तर राखीव प्रवर्गासाठी ३५% गुण असणे आवश्यक असणार आहे.

अर्ज शुल्क माहिती

BOB Recruitment एक्साम फी:

  1. सामान्य/OBC/EWS: ₹८५०/- (GST सह)
  2. SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: ₹१७५/- (GST सह)

अर्ज शुल्क हे UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावे लागणार आहे.

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

Bank of Baroda Bharti 2025 मध्ये ऐकून २५०० पदांसाठी ही भरती होत आहे, सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी पात्र उमेदवांकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करून नोकरीची संधी साधावी. अधिक माहितीसाठी bankofbaroda.in वेबसाईट ला भेट द्यावी.

सरकारी नोकरीच्या लेटेस्ट अपडेटसाठी दररोज भेट द्या: लोकमराठी न्यु पोर्टल

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile