भारतीय रेल्वेचे ५ नवे नियम, जाणून घ्या १ जुलैपासून काय बदलले? Indian Railways New Rules

Date:

Indian Railways New Rules: १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ५ महत्त्वाचे नवे नियम लागू केले आहेत. प्रामुख्याने यामध्ये दरवाढ, चार्ट तयार करण्याचा बदल, वेटिंग यादीची मर्यादा कालावधी, तत्काळ बुकिंगसंबंधी निर्बंध आणि आधार व्हेरिफिकेशन यांचा समावेश केला आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! Indian Railways New Rules July 2025

IRCTC new rules 2025: जर तुम्ही रेगुलर रेल्वे प्रवास करत असाल, तर १ जुलैपासून लागू झालेल्या भारतीय रेल्वेच्या नव्या नियमांची तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यकआहे. या नवीन नियमांमुळे आता तिकीट दर, बुकिंग पद्धत व आरक्षण पद्धत यामध्ये मोठे बदल इंडियन रेल्वे ने केले आहेत. रेल्वे मंत्रालयाने याचे सामान्यतः उद्दिष्ट प्रवास अधिक सरळ व पारदर्शक ठेवणे स्पष्ट केले आहे.

१. रेल्वे तिकीट दरवाढ 2025

जुलै 2025 पासून रेल्वे प्रवास महागला आहे. इंडियन रेल्वे मधील नॉन-एसी द्वितीय श्रेणीसाठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे, यात सरासरी ५०० किमीपेक्षा अधिक प्रवासासाठी दर किलोमीटर ०.५ पैसे वाढ करण्यात आलेली आहे याचबरोबर मेल एक्सप्रेस ट्रेनसाठी चे ही दर वाढले आहेत, आता प्रवाशांना प्रति किमी १ पैसे जास्त जास्त करण्यात आले आहे. आता ह्यासोबतच एसी क्लास प्रवासही महागला गेला आहे, यामध्ये प्रति किमी २ पैसे अधिक प्रवाशांनकडून आकारण्यात येईल

हा जरी खर्च कमी असला तरी तुम्ही ह्या उधाहरणारून समजू शकता जर तुम्ही १००० किमीचा प्रवास रेल्वे ने करत असाल, तर आता ऐकून भाड्यात ₹१०-₹२० अधिक चार्जे भरावा लागणार आहे.

२. आरक्षण चार्ट आता ८ तास आधी तयार होणार

Indian Railways New Rules रेल्वे मधील सर्वात मोठा आणि सर्वांच्या हिताचा निर्णय म्हणजे आता आरक्षण चार्ट ८ तास आधी तयार होणार आहे, त्यामुळे कन्फर्मेशन वेळेवर मिळण्याची दाट शक्यता प्रवाशी वेळेची बचत देखील ह्यामाध्यमातून होणार आहे. जर आपण यापूर्वी पहिले तर चार्ट फक्त ४ तास आधी तयार होत होता, त्यामुळे प्रवाशांना कन्फर्मेशन वेळेवर मिळत नव्हते हाच प्रश्न रेल्वेमंत्रालयाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. या महत्वाच्या नियमामुळे वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्यांना लवकरात लवकर अपडेट मिळेल आणि त्यानं पुढील तयारी करता येईल.

३. वेटिंग लिस्ट मर्यादेत मोठा बदल

Railway waiting list limit: वेटिंग लिस्ट मर्यादेत जर आपण जुनी मर्यादा (२०१३) नुसार पहिली तर AC-1 मध्ये ३०, AC-2 मध्ये १०० आणि Sleeper मध्ये ४०० पर्यंत वेटिंग लिस्ट होती पण आता जुलै २०२५ नियमानुसार प्रत्येक कोचच्या एकूण बर्थ क्षमतेच्या केवळ २५% वेटिंग तिकीट देण्याचा नियम बनवण्यात आला आहे. याचाच अर्थ जर स्लीपरमध्ये ५०० बर्थ असतील, तर फक्त १२५ तिकीट वेटिंग लिस्टमध्ये दिले जातील. यामाध्यमातून अनावश्यक गर्दी आणि अनिश्चितता कमी होण्यास मदत देखील होईल.

४. तत्काळ बुकिंगमध्ये एजंट्ससाठी निर्बंध

तत्काळ तिकीट बुकिंग नियम: आधिकारिक IRCTC रजिस्टर्ड एजंटना सुरुवातीच्या अर्धा तास तत्काळ तिकीट बुकिंग करता येणार नाही. यामध्ये AC क्लाससाठी रजिस्टर्ड एजंटना सकाळी १०:०० ते १०:३० दरम्यान बंदी करण्यात आलेली आहे तर Non-AC साठी सकाळी ११:०० ते ११:३० दरम्यान बंदी असणार आहे याचा सरळ सरळ फायदा आता सामान्य प्रवाशांना होणार आहे आणि यातूनच बुकिंगची संधी डायरेक्ट प्रवाशांना मिळणार आहे.

५. बुकिंगसाठी ‘आधार’ अनिवार्य

रेल्वे मधील आत्तापार्येंतच हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे (Indian Railways New Rules) आता फक्त आधार व्हेरिफाइड युजर्सना IRCTC वरून तत्काळ तिकीट बुक करता येणार म्हणजेच आता जे एजंट्ससाठी जास्तीचे टिकिट्स खरेदी करून जास्त किमतीत विकत होते हे प्रमाण आता अत्यंत कमी किंवा नाहीशे होईल आणि यामुळे गरजूंना तत्काळ प्रवास करणाऱ्यांना अधिक संधी मिळण्यास मदत होईल.

Indian Railways New Rules नियमांमुळे भारतीय रेल्वे अधिक पारदर्शक आणि प्रवाशांना सोयीस्कर बनणार आहे. या नियमांमुळे बुकिंग प्रक्रियेत साफ स्पष्टता येईल आणि प्रवास देखील अधिक सुकर होईल.

रेल्वे संबंधित सर्व अपडेट्ससाठी याचसोबत ताज्या बातम्यांसाठी आजच भेट द्या www.LokMarathi.com

Source: IRCTC Website

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile