Instagram Friend Map Feature: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’ ने भारतात प्रथमच ‘फ्रेंड् मॅप’ (Friend Map) हे फीचर सर्वच यूजर्सकरीत आणल असून यातून आता रिअल-टाइम लोकेशन मित्रांसोबत शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. यासोबतच आपल्या जवळपास आलेल्या मित्रांसोबत भेटीसाठी हे उपयुक्त असणार आहे. यामध्ये मित्रांचे ‘हँगआऊट स्पॉट्स’ शोधता येणार आहे.
Instagram Friend Map म्हणजे काय?
Instagram New Feature: इन्स्टाग्रामच फ्रेंड् मॅप हे फीचर अगदी Snapchat मधील Snap Map सारखं आहे. यामध्ये यूजर्स आता मेसेजेस टॅबमधील ‘मॅप सेक्शन’ ऑपशन मध्ये रिअल टाईम लोकेशन शेअर करू शकतात. या मध्ये यूजर्स ची काळजी घेत हवं असल्यास आपल लोकेशन आपण संपूर्णपणे बंद देखील ठेऊ शकतो.
फ्रेंड् मॅप हे फीचर सध्या ऑप्ट-इन आहे म्हणजेच आपण जोपर्येंत स्वतः ते सक्रिय करत नाही तोपर्येंत आपली लोकेशन इतरांना दिसणार नाही.
Friend Map काय आहेत फायदे:
- जवळच्या मित्रांसोबत लवकर भेट होण्यास मदत होईल.
- सध्या तुमचा मित्र कोठे आणि कोणत्या ठिकाणी आहे ते समजल.
- एकाच वेळी सर्वच मित्र कुठे कुठे आहेत ते समजल.
- निवडक मित्रांसोबत तसेच जवळच्या मित्रांचा ग्रुप बनून त्याचे लोकेशन पाहण्यास मदत होईल.

सुरक्षेबाबत गंभीर चिंता
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे जरी हे फीचर सोयीस्कर असलं तरी काहीवेळी हे धोकादायक देखील ठरू शकता त्यामुळे गरज असल्यासच याचा वापर करा कारण यामध्ये रिअल-टाइम लोकेशन शेअर केल्याने सोमोरचा तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ शकतो. सोबतच लोकेशन बद्दल आपल्या आपल्या मोबाईल मध्ये ऍक्सेस दिल्यास तुम्हाला टार्गेटेड लोकेशन जाहिराती सुद्दा दिसू शकतात. सध्या हे फीचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड नाही यामुळे याचा गैरवापर देखील होऊ शकतो. त्यामुळे शक्य नसल्यास ते बंदच राहू द्या.
विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न FAQ
प्रश्न – Instagram Friend Map ने मुलींना फायदा होईल का?
उत्तर – होईल, परंतु विश्वासू मैत्रिणींसोबतच आणि घरकयांसोबतच हे शेयर करा.
प्रश्न – कोणत्या मित्रांसोबत आपण हे शेयर करू शकतो?
उत्तर – Friend Map हे पूर्णपणे युजर-नियंत्रित आहे, यामध्ये तुम्ही निवडक किंवा क्लोज फ्रेंड्ससोबत लोकेशन शेयर करू शकता.
प्रश्न – याचे काही धोके आहेत का?
उत्तर – जर आपले लोकेशन चुकीच्या व्यक्तींशी शेअर झाल्यास प्रायव्हसीचा धोका होऊ शकतो.






