“मेड इन इंडिया” चिप्स यावर्षी बाजारात, सेमीकंडक्टर क्षेत्रात PM Narendra Modi यांची मोठी घोषणा Semiconductor Sector

Date:

नवी दिल्ली | 15 August 2025 । Semiconductor Sector : आज संपूर्ण भारतात 79 वा स्वातंत्र्य उत्साहात साजरा होत आहे, यातच आता पंतप्रधानांनी सकाळीच लाल किल्ल्यावरून चक्क 103 मिनिटांचे लांब भाषण देत असताना सेमीकंडक्टर (मेड इन इंडिया चिप्स) क्षेत्राबाबत मोठे विधान केले. आज स्वातंत्र्य दिनाला ‘140 कोटी संकल्पांचा महापर्व’ असे संबोधत भारतातील विकसित तंत्रज्ञान, ऊर्जा आणि देशातील महत्वाच्या प्रमुख योजनांवर ते बोलले.

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची मोठी झेप

PM Narendra Modi हे आज भाषणामध्ये म्हणाले की देशात 50-60 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर उत्पादनच विचार सुरु झाला पण तो काहीं ना काही कारणामुळे पुढे नाही जाऊ शकला आणि याच काळात अनेक देश यामध्ये पुढे गेले. आता यावर भारत काम करत असून ऐकून सहा सेमीकंडक्टर युनिट्सची पायाभरणी पूर्ण झाली आहे हे स्पष्ट केले. यावर्षी अखेरपर्येंत “मेड इन इंडिया” चिप्स बाजारात उपलब्ध होतील, ही महत्वाची आणि ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली.

हे ही वाचा: PM मोदींची घोषणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना! तरुणांना मिळणार 15 हजार रुपये

अणुऊर्जेचा क्षेत्रात विस्तार

सध्या भारत 10 नवीन अणुऊर्जा प्रकल्पात सक्षम कार्य करत असून 2047 पर्येंत अणुऊर्जा सक्षम करत हे दहापट वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, याच बरोबर या क्षेत्रातील खासगी कंपन्यांदेखील सहभागी होऊ शकतात.

Green Energy चे उद्दिष्ट

भारताने 2030 पर्येंत ग्रीन एनर्जी चे लक्ष्य असल्याचा निर्धार केला होता ज्यामध्ये आत्तापार्येंत 50% उद्दिष्ट आधीच पूर्ण झाले आहे. यावर आता संपूर्ण भारतात समुद्राखालील तेल आणि गॅस साठे शोधण्यासाठी नवीन मोहिम लवकरच सुरु करणार आहे जेणेकरून आपला देशाला यावर संपूर्ण आत्मनिर्भरता मिळवता येईल.

याचबरोबर पीएम मोदी म्हणाले सर्वांनाच माहित आहे आपण ऊर्जेसाठी अनेक देशांवर अवलंबून असून पेट्रोल, डिझेल, गॅस यामध्ये आपण लाखो कोटी रुपये खर्च करतो याच संकटातून बाहेर काढून आपण देशाला स्वावलंबी करू कारण आज 11 वर्षात सौरऊर्जेचा वापर 30 पटीने वाढला आहे.

Source: DD News Government of India

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile