PM मोदींची घोषणा: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना! तरुणांना मिळणार 15 हजार रुपये, 3.5 कोटी नव्या नोकऱ्यांचे लक्ष्य

Updated On:

नवी दिल्ली | 15 August 2025: आज 79 वा स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना मोठ्या उत्सहात ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ची घोषणा केली आहे. लालकिल्याकरुन देशवासीयांना मोठी भेट या माध्यमातून देत तब्बल 1 लाख कोटी रुपयांची ही योजना असणार आहे. ही योजना नौकरीच्या संधी वाढवणायसाठी आणि प्रथमच नौकरी मिळवणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना

PM Modi employment scheme: पंतप्रधानाची ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ जाहीर केल्यानंतर सर्वच युवक-युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पहिल्यांदा नौकरी मिळालेल्या तरुणांसाठी आता थेट 15,000 रुपयांची सरकारी मदत मिळणार असून सोबतच नवीन भरती करणाऱ्या कंपनीला देखील 3000 रुपये प्रति महिना प्रोत्सहन दिले जाणार आहे. या योजनेमध्ये मैन्युफैक्चरिंग मधील विविध कंपन्यांना अतिरिक्त मदत देखील केली जाईल.

या योजनेमुळे देशात 2 वर्षात तब्बल 3.5 कोटी नव्या नोकऱ्या मिळणार असून यामध्ये ऐकून 1.92 कोटी युवक प्रथमच नौकरी मिळवणार आहेत.

हे ही वाचा: 15 हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रिमंडळात 4 महत्वाचे निर्णय । तयारीला लागा….

योजनेची सुरवात

PM Viksit Bharat Bharat Rojgar Yojana या योजनेची सुरवात श्रम व रोजगार मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निधी संस्था (EPFO) मार्फत 15 August 2025 आजपासून राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून खासगी क्षेत्रात पहिले नौकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी आणि त्या नियुक्त्यानी दोघांनाही या योजनेचा लाभ होणार आहे.

आज PM Narendra Modi यांनी ही योजना ‘विकसित भारत मिशन’ चा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगताना 2047 पर्येंत एक समृद्ध आणि विकसित भारत उद्दिष्टाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Source: DD News

Ministry of Labour & Employment, Government of India – Tweet:

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile