HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ, वाहनधारकांना दिलासा आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची संधी (HSRP Number Plate)

Date:

HSRP Number Plate: देशातील अद्याप HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शासनाने आता High Security Registration Plate (HSRP) बसवण्याची शेवटची तारखेत मुदत वाढून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत केली आहे. ही मुदतवाढ जुन्या सोबतच नवीन वाहनावर देखील लागू असणार आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन सुरक्षित आणि कायदेशीर नियमाचे पालन करण्यासाठी आणखी अतिरिक्त वेळेला मंजुरी मिळाली आहे.

HSRP Number Plate

HSRP चा फुल्ल फॉर्म High Security Registration Plate असा आहे. ही वाहनांकरिता उच्च सुरक्षा नंबर प्लेट असून या मध्यातून वाहनांची चोरी, क्लोनिंग तसेच वाहनांची फेरफार रोखण्यासाठी सरकाद्वारे तयार कार्यांत आलेली आहे. HSRP प्लेट मध्ये QR कोडे, रिफ्लेक्टिव्ह फॉइलिंग असे महत्वाचे डिजिटल सुरक्षेचे वैशिष्ट्य आहेत. या नंबर प्लेट ने आता वाहनांची ओळख सोपी होणार असून जर कोणी वाहतुकीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यास मदत होणार आहे.

HSRP नंबर प्लेट मुदत वाढ

या आधी शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये 15 August 2025 शेवटची तारीख ठेवण्यात आली परंतु आता यामध्ये मुदत वाढ झाली असून शेवटची तारिख 30 November 2025 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मुदतवाढीमागील प्रमुख कारणे ज्यामध्ये अनेक वाहनांनी अद्याप HSRP नंबरप्लेट बसवलेली नाही तसेच शहरी भागात अपॉइंटमेंट मिळण्यात खूप अडचणी येत आहेत आणि ग्रामीण भागात फिटमेंट केंद्रांची कमी असल्यामुळे वाहनधारकडून केलेल्या मागण्यांमुळे ही मुदतवाढ केली आहे.

HSRP महत्वाच्या सूचना

वारील मुदतवाढीसोबत सरकाराने वाहनधारकांना काही महत्वाचा सूचना केल्या आहेत:

  • वाहनधारकांनी 30 November 2025 पूर्वी आपल्या वाहनावर HSRP Number Plate बसवावी.
  • अधिकृत फिटमेंट केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे बुकिंग वेळेत करावी.
  • आवश्यक कागतपत्रांसोबत फी भरावी.
  • जर दिलेल्या कालावधीत नियमाचे पालन नाही केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

सरकारने HSRP Number Plate बसवण्यासोबतच हे स्पष्ट केले आहे कि 1 December 2025 नंतर नंबरप्लेट नसलेल्या वाहनावर वाहतूक विभाग कठोर पावले उचलणार असून वाहनधारकांवर दंड, वाहन जप्ती व कायदेशीर कारवाई केली जाणार त्यामुळे दिलेल्या वेळेत नंबर प्लेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे.

Thumbnail Image Source: Youtube Prak’s Bikers Guide

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile