पावसाळा सुरू झाल्यानंतर तुमचाही चेहरा खराब होऊ लागतो का? पावसाळ्यात स्किनची काळजी घ्या Monsoon Skin Care Tips

Date:

Monsoon Skin Care Tips: वातावरणात बदल झाला की आपल्या शरीरावरही त्याचा परिणाम दिसून येतो, तसंच त्वचेवर सुद्धा दिसून येतो जस की उन्हाळ्यात स्किन टॅनिग होते तर हिवाळ्यात स्किन ड्रायनेस होत. तसंच पावसाळ्यातही आपली स्किन तेलकट आणि चिकट होऊन खूप सारे पिंपल्स ने त्वचा खराब होऊ लागते. तर आज आपण पाहुयात ह्या प्रॉब्लेम ला आपल्या त्वचेपासून कस लांब ठेवायचं. योग्य स्किनकेअर केल्यास, तुमची ही त्वचा पावसाळ्यातही ग्लोविंग राहू शकते.

Monsoon Skin Care Tips

पावसाळ्यात वातावरणात जास्त आर्द्रता व जास्त ओलावा आल्यामुळे आपली त्वचा तेलकट किंवा चिकट होऊ लागते पण हा त्रास त्यांनाच होतो ज्यांची स्किन पहिलेच तेलकट असते. यामुळे चेहऱ्यावर तेल जास्त वेळ साचून राहुल की पिंपल्स किंवा पुरळ येऊ लागतात. ते 4 ते 5 दिवसात कमी देखील होतात व त्यांचे डाग मात्र कायमचे सोडून जातात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो कायमचा निघून जातो. पण जर आपण काही चुका टाळल्यातर आपली स्किन पावसाळ्यात सुद्धा ग्लोविंग आणि चमकदार राहू शकते.

हे पण वाचा: तुम्हाला पण केसगळतीचा त्रास आहे का ? मग हा उपाय वापराच

पावसाळ्यात त्वचेची काळजी घ्या Skincare for Monsoon

सर्वात आधी आपल्याला आपला चेहरा दिवसातून 2 वेळा तरी धुवायचा आहे. ज्याने आपल्या स्किन वरच तेलकटपणा तर कमी होतोच पण चिकटपणा देखील कमी होतो. तुम्ही यामध्ये फेसवॉश चा वापर करू शकता.

त्याचबरोबर आठवड्यातून कमीतकमी 2 वेळा सौम्य आणि नैसर्गीक स्क्रब वापरणं देखील अत्यंत फायद्याचं ठरत. त्यासाठी आपण हळद, बेसन पीठ, आणि गुलाब पाणी ह्याची पेस्ट चेहऱ्यावर हळूवार मसाज करू. वापरायची आहे आणि नंतर धुऊन टाकायची आहे ह्यामुळे आपल्या स्किन वरची मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावरची पोर्स पण ओपन होतात.

आता आपण आपल्या चेहऱ्यावर आलेली पिंपल्स किंवा पुरळ कसे घालवायचे हे बघू . त्यासाठी आपल्याला आपला चेहरा जेवढा कोरडा ठेवता येईल तेवढा कोरडा ठेवायचा आहे. आणि पिंपल्स जर आले असतील तर त्यासाठी शुद्ध गाईचं तूप थोड कोमट करून जिथे पिंपल्स आले असतील तिथं लावायचे ह्यामुळे तुमचे पिंपल्स फक्त 2 दिवसातच कमी होतील .

गुलाबजल आणि चंदन सुद्धा आपल्या स्किनला ताजगी देत आणि जळजळ कमी करून लालसरपणा देखील कमी करत त्याचबरोबर तेल कमी करून चेहरा तेजस्वी ठेवण्यास देखील मदत करतो.

हे वाचा: गुलाबी ओठ हवे आहेत का? हे घरगुती उपाय गुलाबी ओठांसाठी खास

Skincare for Monsoon अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात स्किन ची काळजी घेतली तर तुमची स्किन देखील सुंदर दिसण्यास नक्कीच मदत करेल.

सौंदर्य आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी वर आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.