Maharashtra Police Bharti 2025: पोलीस भरतीची अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी अखेर आनंदाची बातमी अली आहे. महाराट्र मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेत आता तब्बल 15,000 पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे, 12 August 2025 रोजी झालेल्या या मंत्रिमंडळात हा मत्वाचा निर्णय घेणार आला असून सोबतच 4 महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहे.
पोलीस भरती प्रक्रियेला वेग, मंत्रिमंडळाचा निर्णय
12 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्री मंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली, यावेळी गृह खात्याने मांडलेल्या 15 हजार पोलीस भरतीला प्रस्तावाला मान्यता भेटली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे दिसून आले त्यामुळे वर्षांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले, पण आता सरकारनेच दिलेल्या या मंजुरीमुळे पोलीस भरती प्रक्रिया वेगाने सुरु होणार आहे.
मुख्यमंत्र्यां देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना दिलेली माहिती
Maharashtra Police Bharti 2025
पोलीस भारतीकरिता भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या:
| पोलीस भरती पदे | जागा |
| पोलीस शिपाई | 12,399 |
| पोलीस शिपाई चालक | 234 |
| बॅण्ड्स मॅन | 25 |
| सशस्र पोलीस शिपाई | 2393 |
| कारागृह शिपाई | 580 |
| ऐकून जागा | 15,631 |
हे पण वाचा : PM मोदींची घोषणा: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना! तरुणांना मिळणार 15 हजार रुपये
मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेतील मागील निर्णय
मागील महिन्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13,560 पोलीस भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली होती, असेच याआधी पण जुन महिन्यामध्ये पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू कारण्याबात विधान केले होते आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी घेण्याचे संकेत दिले परंतु प्रक्रिया सुरु न झाल्याने विद्यार्थी समन्वय समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
मंत्रिमंडळातील 4 महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळाच्या या बैठकिती ऐकून चार महत्वचे निर्णय घेतले आहे:
- महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ जार पोलीस भरतीस मंजुरी.
- राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
महाराष्ट्रातील मूखुमंत्र्यांनी मंत्रिमंडळात झालेल्या या बैठकीतील पोलीस भरती निर्णयामुळे हजारो तरुण आनंदात असून आता ही भरती लवकरात लकवकर सुरु होईल अशी अपेक्षा करत आहे.







