Blackheads removal at home: ब्लॅकहेड्स काय आहेत हे आपण आधी जाणून घेऊया, ब्लॅक हेड्स छोटे काळे दाणे असतात ते तेव्हाच दिसतात जेव्हा आपल्या त्वचेवरचे रोम छिद्र (pores) आपल्या चेहऱ्यावरच्या तेलाने किंवा मृत त्वचेने भरून जातात तेव्हा ते कळ्या दाण्यामध्ये रूपांतर करतात. हे काळे दाणे जास्तीत जास्त नाकावर आणि माथ्यावर दिसतात.
ब्लॅकहेड्स होण्याचे करण काय आहेत
ब्लॅक हेड्स होण्याच महत्वाचा कारण म्हणजे आपल्या त्वचेचे रोमछिद्र मध्ये तेल किंवा घाण जाऊन त्वचेच्या पेशी बंद होतात. त्यामुळे ते ऑक्सिडाइज होऊन काळसर होतात आणि त्याचे रूपांतर ब्लॅकहेड्स मध्ये होते. यासाठी खूप करणे असतात जसे की:
- आपल्या शरीरात होणारे हार्मोनल बदल.
- खूप जास्त केमिकल युक्त स्किन केअर प्रोडक्ट वापरन.
- त्वचेची काळजी न घेणं.
- चेहऱ्यावर खूप तेल तयार होण.
ह्या काही कारणांनी पण ब्लॅक हेड्स होऊ शकतात. तर ते कसे कमी करायचे हे आपण आज ह्या पोस्ट मधे पाहणार आहोत. आपण घरीच नाक आणि इतर भागांवरचे ब्लॅक हेड्स घालवू शकतो तेही अगदी नैसर्गीक रित्या.
Beaking Soda Scrub
आपल्या घरात असणारा बेकिंग सोडा जो की त्वचेवर स्क्रब सारखं काम करतो. यासाठी आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचंय अर्धा चमचा आणि त्याची एक पेस्ट तयार होईल इतक त्यात पाणी टाकून ते ब्लॅक हेड्स च्या जागेवर हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे आणि नंतर 5 मिनिटे तसंच ठेवून नॉर्मल पाण्याने धून टाकायचं आहे. अस तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केलं तर नक्कीच ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होईल.
Face Steaming
वाफ घेणं आपल्या त्वचेसाठी खूप फायद्याचं असत कारण त्याने आपल्या त्वचेवरचे जे पोर्स असतात ते ओपन होऊन त्यातली ब्लॅक हेड्स बाहेर पडण्यास मदत होते आणि ब्लॅक हेड्स बाहेर येणं खूप सोप जात. यासाठी गरम पाण्याची वाफ चेहऱ्यावर घ्यायची आहे. नंतर हळुवार स्क्रब करा वर हळुवारपणे ब्लॅकहेड्स बाहेर काढा.
हे ही वाचा: Facial सारखा ‘ग्लो’ घरीच हवाय? घरच्या घरी नैसर्गिक फेशियल!
Potato & Honey
Blackheads removal at home: बटाटा हो बटाटा पण आपल्या स्किन साठी खूप छान असतो. त्यासाठी आपल्याला बटाट्याचा रस काढून घेऊन त्यात थोडा मध टाकून ते पूर्ण चेहऱ्याला लावलं तरी चालत. त्याने ब्लॅक हेड्स तर कमी होतेच सोबतच
आपली स्किन उजळण्यास पण मदत होते आणि आपल्या चेहर्या वरच्या सुरकुत्या पण कमी करण्यास फायदेशीर ठरते.
ब्लॅकहेड्स साठी महत्वाचा हेल्थ टिप्स
Blackheads removal at home: आपल्यला यासोबतच आपल्या हेल्थची काळजी घेणं पण तेवढच महत्वाचा आहे, जर तुम्हाला पण ब्लॅकहेड्स कमी करायचे असलं तर दररोज भरपूर पाणी प्या ज्याने तुमची स्किन हायड्रेटेड राहील आणि सतत चेहरा धुवत राहा.
हेल्थ आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.







