Natural Bleach at Home in Marathi: तर सर्वात आधी ब्लिच म्हणजे काय ते पण जाणून घेऊयात. तर ब्लिच म्हणजे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी आणि आपल्या त्वचेवरच्या केसांना फिकट रंग करण्यासाठी वापरली जाणारी एक क्रीम आहे. केमिकल ब्लिच चा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने आपण ब्लिच करू शकतो ते कसं हे आपण या लेखात पाहणार आहे.
Step 1 दही आणि मध
आपल्याला दही घ्यायचंय ज्यामध्ये लॅक्टिक ऍसिड जे त्वचेसाठी खूप फायद्याचं असत त्यात ब्लिचिंग प्रॉपर्टीस असतात. तर दह्यामध्ये थोडा मध मिक्स करून ते चेहऱ्याला 10 मिनिटे तसंच ठेवा नंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्या. अस केल्याने आपली सावळी त्वचा उजळण्यास मदत होते.
Step 2 संत्री आणि हळद
संत्री मध्ये व्हिटॅमिन C असत, जे की त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या आहारात संत्र्याच्या रसाचा समावेश करायचा आहे म्हणजेच पोटातून पण आपल्या त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. संत्र्याच्या रसात चिमूटभर हळद टाकून लावल्यास त्वचा हळू हळू उजळू लागते त्याचबरोबर टॅन कमी होण्यास मदत होते.
हे वाचा: Facial सारखा ‘ग्लो’ घरीच हवाय? नैसर्गिक फेशियल!
Step 3 बेसन आणि दही
बेसन आणि दही, 2 चमचे बेसन पीठ आणि चार चमचे दही मिक्स करून हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने वॉश करा ह्यामुळे आपल्याला स्किन वर चांगले परिणाम दिसून येतील ज्याने आपली स्किन आणखी ब्राइट होते.
Step 4 लिंबू आणि मध
लिंबू आणि मध: लिंबामध्ये असलेले ऍसिड आपल्या त्वचेवर ब्लिच सारखे काम करते आणि त्वचेला उजळण्यास पण मदत करते. लिंबाच्या रसात थोडा मध टाकून लावल्याने चेहऱ्याचा पोत सुधारतो आणि त्वचेच्या नवीन पेशी बनवण्यास पण मदत करतो ज्याने आपला चेहरा ग्लो होण्यास मदत होते.
हे वाचा: तुम्हाला पण केसगळतीचा त्रास आहे का? मग हा उपाय वापराच…
Step 5 मसुर डाळीच पीठ
मसुर डाळीच पीठ पण आपल्या चेहऱ्यावर ब्लिच च काम करत त्यासाठी आपल्याला मसुर डाळीचं पीठ आणि थोड दही मिक्स करून चेहऱ्याला लावायचं आहे त्यामुळे चेहऱ्याला ब्लिच सारखी चमक येण्यास मदत होते आणि ब्लिचसारखा नैसर्गिक ग्लो मिळतो.
Natural Bleach at Home in Marathi वरील सर्व 100% नैसर्गिक उपाय आहे याने तुम्ही घरच्या घरीच ब्लिच करू शकता. दिलेल्या पाच स्टेप पैकी जर आपण कोणत्याही तीन अवलंबल्या तर नक्कीच फायदा होईल.
Skin care tips आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.







