त्वचेचा रंग उजळवण्यासाठी काही घरगुती टिप्स Glowing Skin Tips

Date:

Glowing Skin Tips: सुंदर , तेजस्वी , दागविरहित ,चमकदार त्वचा सगळ्यांनाच हवी असते पण प्रत्येकाचं स्किन टाइप वेगळी वेगळी असते तर आज आपण त्वचा उजळण्यासाठी काही घरगुती उपाय बघूया.

पपईचा उपयोग (Papaya for Glowing Skin)

आपल्याला सर्वात आधी पपई चा एक तुकडा घेऊन तो चांगला बारीक खिसून किंवा चांगला बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे आणि त्याची पेस्ट आपल्या त्वचेवर लावायची आहे . साधारण 5 मिनिटे मसाज करत करत नंतर तशीच सुकू द्यायची आहे आणि नंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुऊन टाकायचा आहे. हा उपाय रोज केल्यास तुम्हाला नक्कीच त्वचा उजळलेली लक्षात येईल.

नारळ पाणी (Coconut Water)

नारळ पाणी पण आपल्या चेहऱ्याच्या हायड्रेशन साठी फार उपयुक्त आहे त्यामुळे आपली त्वचा ताजीतवानी तर दिसतेच सोबतच आपल्या चेहऱ्यावरच्या काळेपणा पण कमी करते. त्यासाठी आपल्याला नारळ पाणी चेहऱ्यावर लाऊन सुकू द्यायचे आहे आणि नंतर ते नॉर्मल पाण्याने धुऊन टाकायचे आहे अस केल्याने आपली त्वचा उजळण्यास तर मदत होईलच सोबतच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पण कमी व्हायला मदत होईल.

केळीचं साल (Banana Peel)

केळी च साल सुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप फायदे देणार आहे. केळी खाऊन साल फेकून न देता त्याने चेहऱ्याला मसाज केला तर त्वचा चमकदार व्हायला वेळ लागणार नाही आणि त्वचेवरचे डाग पण कमी होतील.

लिंबू आणि तांदळाचं पीठ (Lemon and Rice Flour)

लिंबू तर सर्वांनाच माहिती आहे, व्हिटॅमिन C ने भरपूर असलेल लिंबू पण त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करत. तर अर्धा लिंबू घेऊन तो आपल्याला तांदळाच्या पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि त्याने आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचा आहे. मानेवर, चेहऱ्यावर मसाज करायचा आहे जेणेकरून आपल्या त्वचेवरची मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होईल.

हे ही वाचा: Facial सारखा ‘ग्लो’ घरीच हवाय? घरच्या घरी नैसर्गिक फेशियल!

आहार (Healthy Diet for Skin Glow)

ह्या सगळ्या सोबतच आपल्याला आपल्या आहाराकडे पण तितकाच लक्ष देणं गरजेच आहे . पालेभाज्या, फळ ज्यामध्ये खूप व्हिटॅमिन आणि मिनरल असतात त्याने आपली स्किन अजून चमकदार आणि उजळ दिसण्यास फायदा होतो. पाणी पण आपल्या स्किन साठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपल शरीर तर हेल्दी राहतच सोबतच स्किन पण हेल्थी राहते.

जर तुम्ही या गोष्टींचा दैनंदिन जीवनात वापर केला तर तुमच्या त्वचेचा रंग देखील उजळून येणास मदत होईल.

हेल्थ आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.