Healthy Lifestyle Marathi शरीरासाठी काही खास टिप्स, जाणून घ्या उपाय!

Date:

Healthy Lifestyle Marathi: लाइफ जगताना प्रत्येकाला काही न काही अडचणी किंवा शारीरिक त्रासाला समोर जावं लागत तर त्यातलाच एक त्रास म्हणजे शारीरिक त्रास किंवा दुखणे यावर आपण काही सोपे उपाय पाहुयात

Back pain पाठ दुखी

पाठदुखी अनेकांना होते त्याची कारणे पण अनेक आहेत जस की नकळत आपल्या शरीराला जर कधी दुखापत झाली तर त्याची कळ शरीराच्या वरच्या भागावर जाते आणि आपल्याला पाठदुखीचा त्रास उद्भवतो. तर त्यापासू आपण कसा आराम घेऊ शकतो.

पाठदुखी जर होत असेल तर पाठीचा कणा मजबूत बनवण्यासाठी आणि पाठीला आराम देण्यासाठी उशी वापरण टाळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पाठदुखी पासून आराम मिळतो आणि गाधीवर झोपणे टाळलं पाहिजे जमिनीवर झोपणे केव्हाही चांगले.

भूक न लागणे

भूक न लागण्याचे देखील अनेक कारणे असू शकतात. जसे की खाण्याची इच्छा न होणे जर तुम्ही खूप ताण तणावामधे राहत असाल तर देखील हा त्रास होऊ शकतो. काहीही न खाता सुद्धा पोट भरल्यासारखे वाटणे अशा अनेक समस्या असू शकतात. तर त्यावर उपाय म्हणून आपण रोज नियमित थोडा तरी व्यायाम करण खूप फायद्याचं ठरत आणि त्यासोबतच पाणी भरपूर प्यायल्याने आपल्या शरीरातले विषारी घटक बाहेर पडायला मदत होते ज्यामुळे आपल्याला भूक लागण्यास मदत होते .

Healthy Lifestyle Marathi ताण तणाव कमी करणे देखील आपल्या भुकेवर प्रभावी ठरू शकते. गुळ खाल्याने आपल्या शरीरात एनर्जी येते आणि आपल्याला भूक लागण्यास मदत होते तसेच लिंबू पाणी घेणे पण उपयोगी ठरू शकते. लिंबू चे लोणचे खान पण भूक लागण्यास मदत करू शकते.

हे वाचा: दूधात साखर की मध? आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला..

केस कमजोर होण

आपण जर सौंदर्याचा विचार केला तर केसांच सौंदर्य पण खूप महत्वाच आहे केसांच सौंदर्या साठी आपल्या शरीराचं हेल्थी असंन पण खूप महत्वाच आहे. पण कधी कधी आपल्या न कळत आपल्याकडून काही चुका होतात त्यात्यामुळे आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यातल्या काही चुका म्हणजे एकदम कडक कडक पाण्याने केस धून हे केसांना खराब करत. केसांना वेळच्या वेळी ऑइलिंग न करण, केस जास्त काळ न धून, केसांना आवश्यक असलेले व्हिटॅमिन न खान पण केसांना खराब करू शकत.

Healthy Lifestyle Marathi त्यासाठी आपल्याला केसांना आठवड्यातून किमान 2 वेळा तेल लावण महत्वाच आहे. आठवड्यातून 2 वेळा केस धून पण महत्वाच आहे. जेवढ शक्य होईल तेवढं आपण थंड पाण्याने केस धून फायद्याचं आहे. पालेभाज्या, फळ चांगले हेअर केयर प्रोडक्ट वापरणे पण केसांसाठी महत्वाच आहे.

हेल्थ आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.