Donald Trump Tariff News | 06 August 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा मोठा आर्थिक आघात केला. अमेरिकाने भारताला आता आणखी अतिरिक्त 25% आयातशुल्क लावण्याची घोषणा केली. याआधीच काही दिवसांपूर्वीच ट्रम्प सरकारने भारतावर 25% टॅरिफ लावले त्यामुळे आता एकूण आयातशुल्क 50% एवढा झाला आहे. याने भारताला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
रशियाकडून तेल खरेदीच कारण
Donald Trump कडून यामागचं कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की भारताला याआधी पण सुनावले होते की रशियाकडून तेल खरेदी करू नका पण तरीसुद्धा त्यांनी रशियाकडूनच तेल खरेदी सुरु ठेवल्याने अमेरिकेने हा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात धमकी वजा इशारा दिला होता.
27 ऑगस्टपासून लागू होणार अतिरिक्त 25% कर
India US Import Duty: डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्पष्टपने बोलताना अतिरिक्त टॅरिफ 27 ऑगस्ट 2025 पासून लावणार असल्याचे जाहीर केले, पण यामध्ये 17 सप्टेंबरपूर्वी अमेरिकेत पोहोचलेल्या कोणत्याही वस्तूंवर हा कर लावणार नाही याना काही विशेष प्रकरची सूट मिळण्याची शक्यता सांगण्यात आली.
काही दिवसाआधीच एक मुलाखतीत ट्रम्प बोलताना म्हणाले “भारत चांगला व्यापार भागीदार नाही. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करून त्यांनी एकप्रकारे युद्धयंत्रणेलाच इंधन पुरवलं अस आहे.” यामुळेच ट्रम्पने भारतावर अधिक आर्थिक कारवाई करताना टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Twitter X Zee Business
Donald Trump Tariff औषधांवर 250% कर
यामधील विशेष बाब म्हणजे अमेरिका लवकरच भारतातील औषधांवरसुद्दा आयात कर वाढून 250% करणार यावर विचार करत आहे. जर असे झालेच तर अमेरिकेच्या इतिहासातील सरावात मोठी कर वाढ ठरू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 जुलै 2025 रोजीच भारतावर 25% कर लावला होता तेव्हापासूनच भारत-अमेरिकेचे संबंध चांगले नसल्याचे नसून येत होत पण आता परत यामध्ये 25% अधिक वाढ केल्याने भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे.
Donald Trump Tariff: भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो. 2022 मध्ये जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध झाला त्यानंतर अमेरिका व त्यासोबतच संपूर्ण युरोपियन देशांनी त्यांच्यावर निर्बंध लावले. पण, भारताने तेव्हाही आणि आजही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरूच ठेवली. भारत हा राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर चालतो ज्यात आपले हित आहे. हेच ट्रम्प याना आवडले नाही त्यामुळे ते आक्रमक धोरण राबवत आहे.
देश-विदेशातील ताज्या बातम्यांसाठी लोकबातमी पोर्टल ला दररोज भेट द्या…










