Sun tan removal home remedies: उन्हामुळे त्वचा निस्तेज होत असते ती कशी कमी करायची ह्यासाठी आज आपण घरगुती टॅन रिमूव्हल टिप्स पाहणार आहोत.
आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या चाऱ्यावर नकळत सूर्याच्या किरणे पडल्याने आपली त्वचा कळी पडती त्यालाच सन टॅनिंग असे म्हणतात. तर ते आपण कमी करू शकतो. हो अगदी आपल्या स्वयंपाक घरातल्या काही नैसर्गिक गोष्टी वापरून आपल्या स्किन वरच टॅनिंग आपण कमी करू शकतो.
टॅन रिमूव्हलसाठी घरगुती फेस मास्क
Tan removal mask: तर आपल्या शरीरावर जर कुठे टॅनिंग झालं असेल तर त्यासाठी आपल्याला कच्च दूध म्हणजेच न तापवलेल दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला फक्त 2 चिमुटभर हळद आणि 1 ते 2 थेंब लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या स्वयंपाक घरात जे कोणत पीठ तुम्हाला आवडत बेसन / तांदळाचं पीठ / हरभऱ्याचं पीठ ते आपण आपल्या स्किन साठी वापरणार आहे. ह्याची मिक्स पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे अंघोळीच्या आधी लाऊ ठेवा. हा मास्क पूर्णपणे वाळल्यानंतर तुम्ही अंघोळ करताना मसाज करत करत हा मास्क धुऊन टाका.
हे ही वाचा: तुम्हाला पण केसगळतीचा त्रास आहे का ? मग हा उपाय वापराच
Tan removal mask फायदे
Sun tan removal: ह्यामध्ये आपण हळद वापरली आहे हळद काय करते तर उन्हामुळे आपली स्किन खराब झालेली असते ती रिपेअर करण्याचं काम करते. सोबतच आपण लिंबू वापरणार आहे कारण या मध्ये व्हिटॅमिन C असत आणि ते आपली स्किन फेअर होण्यास पण मदत करते आणि डाग देखील कमी होतात. कच्च दूध आपल्या त्वचेला क्लिन्झिंग करण्याचं काम करत तर पीठ ह्या मास्क मध्ये आपल्या स्किन वर स्क्रब सारखं काम करत जेणेकरून आपल्या स्किनवरची मृत त्वचा निघू जाते आणि नवीन त्वचा बाहेर येते.
Skin Care Marathi हा मास्क तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा वापरायचा आहे . ह्या मास्कने आपल्या त्वचेवरचा काळेपणा कमी होण्यास मदत होते…
महत्वाचे: लिंबाचा रस काहींना त्वचेसाठी त्रासदायक ठरतो, त्यामुळे लिंबाचा दिल्याप्रमाणे वापर करावा.
सौंदर्य टिप्सस आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी वर आवश्य भेट द्या.







