Ritha benefits for hair: रिठा केसांसाठी फार उपयुक्त घटक मानला जातो ज्यामुळे आपली केसगळी तर कमी होतेच पण सोबतच आपल्या केसांना चमक देण्याचं काम देखील रिठा करतो त्यांना अधिक मजबूत बनवतो केस वाढवण्यास मदत करतो डँड्रफ असेल तर ते पण रिठा कमी करण्यास खूप लाभदायक मानला जातो अशा अनेक समस्यांवर रिठा खूप परिणामकारक मानला जाणारा एक नैसर्गिक शाम्पू आहे.
Hair fall साठी रिठा कसा वापरावा
केसगळती साठी सगळ्यात आधी रिठा उन्हामध्ये कडक होईपर्यंत सुकून घ्यायचा आहे आणि तो सुकल्यानंतर त्याची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. नंतर एक चमचा रिठा पावडर पाण्यात मिक्स करून ती केसांना लाऊन ठेवायची आहे किमान 10 ते 15 मिनिटे आणि मग धुऊन टाकायची आहे. अस आपण केस धुण्याच्या आधी आठवड्यातू 2 वेळा केल तरी चालेल त्यामुळे केस गळती कमी होण्यास नक्कीच फार मदत होईल.
रिठा आणि आवळ्याची पावडर Hair mask
Reetha powder for shiny and strong hair: रिठा आणि आवळ्याची पावडर चा हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला एका भांड्यात 2 चमचे आवळ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा रिठा पावडर टाकून घ्यायची आहे. हे दोन्ही मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपल्याला थोड थोड करून गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून ह्याची घट्ट पेस्ट बनेल आणि हे मिश्रण अर्धा तास तसंच ठेवून नंतर हा मास्क केसांना लाऊन सुकेपर्यंत थांबायचं आहे आणि मग धुऊन टाकायचं आहे. हा पर्याय तुम्ही आठवड्यातून एक वेळा केला तर तुम्हाला निश्चितच फरक दिसायला लागेल.
हे वाचा: गुलाबी ओठ हवे आहेत का? हे घरगुती उपाय गुलाबी ओठांसाठी खास
रिठा आणि शिकेकाईचा Shampoo
रिठा आणि शिकेकाई चा आपण घरीच शॅम्पू देखील करून लाऊ शकतो ज्याने आपल्या केसांच्या वाढीला मदत होईल आपले केस लांबसडक होण्यास मदत होईल. शॅम्पू बनवण्यासाठी आपल्या गॅस वर पाणी उकळण्यास ठेऊन त्यात 1 चमचा रिठा पावडर आणि अर्धा चमचा शिकेकाई पावडर चांगली उकळी येऊपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण थंड झालं की त्याने तुम्ही शॅम्पू सारखा उपयोग करून केस धुऊ शकता Ritha benefits for hair ज्याने तुमचे केस लांब होण्यास नक्कीच मदत होईल.
महत्वाचे – रिठा डोळ्यात जाऊ नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सौंदर्य टिप्सस आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी वर आवश्य भेट द्या.







