01 ऑगस्ट 2025, मुंबई: महायुती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे सातत्याने करत असलेले वादग्रस्त विधानं आणि विधानसभेत रम्मीचा विडिओ उघडीस आल्यानंतर अखेर त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आलं आहे. आता त्याची जागा राष्ट्रवादीचेच मोठे नेते दत्ता भरणे (Datta Bharne) यांना महाराट्र कऋषीखात्याची जबाबदारी मिळाली आहे, तर आता कोकाटेंकडे फक्त क्रीडा खाते राहणार आहे.
कोकाटेंना वादग्रस्त विधाने भोवली
Manikrao Kokate यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षालाच सामोरे जावे लागत होते. यासोबतच त्यांनी केलेले विधान ‘शेतकरी नव्हे, भिकारी सरकार’ आणि नुकताच विधिमंडळात रमी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच पक्षांनी दबाव वाढला त्याचाच हा परिणाम असून त्यांच्याकडील महत्वाचे कृषी खाते काढून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खातेबदलाची माहिती दिली परंतु रात्री उशिरापर्येंत राज्यपालांची स्वाक्षरी न मिळाल्यामुळे औपचारिकघोषणा थांबली होती. पण आता याची लवकरच अंमलबजावणी होणार असून त्यांचे कृषी खाते दत्ता भरणे याना मिळाले आहे.
Manikrao Kokate विरोधातील न्यायालयीन खटला
सरकारी सदनेचा गैरवापर प्रकरणात कोकाटे याना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती पण तेव्हाही मंत्रिपद गमावण्याची शक्यता असताना, अजित पवारांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता पुन्हा वाद वाढल्याने त्यांचे कृषी खाते काढून घेण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
शिंदे गटाला मात्र अभय
जर सध्या महाराष्ट्रातील राजकारण पहिले तर यामध्ये आतापर्येंत राष्ट्रवादीतील दोन बड्या नेत्यांच्या पदाचा राजीनामा सरकारने घेतला असून मात्र शिंदे गटातील वादग्रस्त मंत्री अजूनही पदावर कायम आहेत. यामुळे विरोधकांकडून शिंदे गटास विशेष अभय मिळतंय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हाराष्ट्र राजकारणातील ताज्या बातम्यांसाठी लोकबातमी ला दररोज भेट देत राहा…







