India-US Trade Tension, 30 जुलै 2025, दिल्ली: अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने भारतावर मोठा निर्णय घेत 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय आता 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. भारत-रशियाचे चांगले व्यापार संबंध याचाच थेट परिणाम आता भारत-अमेरिका व्यापारावर होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची हा निर्णय घेत X वर ट्विट देखील केलं आहे.
Donald Trump यांचा थेट इशारा
अमेरिका व्यापार धोरण: अमेरिकेचे राष्ट्रपती दोन डोनाल्ड ट्रम्प यांनी आज वॉशिंग्टन डीसी येते मीडिया समोर बोलताना म्हणले की “भारताने रशियाकडून केलेल्या वयापारामुळे आम्ही नाराज आहोत. याचा कारणामुळे अमेरिका आता भारतावर 25% टॅरिफसह दंडात्मक कारवाई करणार आहे .” ही कारवाई 1 ऑगस्टपासून करणार असून आता भारतापुढे हे एक मोठं आर्थिक आव्हानच असणार आहे.
ट्रम्प यांच्या यांनी सांगितले कि ‘भारत हा आपला मित्र देश जरी असला तरी देखील आपण भारताच्या तुलनेत त्यांच्याशी कमीच व्यवसाय केला कारण त्यांचे आयात शुलक जगात सर्वात जास्त आहे यासोबतच तेथील अडथळे व भारताने रशिया कडून खरेदी केलेले लष्करी साहित्य आणि ऊर्जेचे सर्वात मोठी खरेदी हे योग्य नाही. ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेन विरोधातील हिंसा थांबवण्यासाठी सांगत असताना हे योग्य नाही, याच कारणामुळे आता भाताला १ ऑगस्ट पासून 25 टक्के आयात शुल्क भारताला भारावा लागणार आहे.’ असे ट्विट ट्रम्प यांनी केल आहे
Tweet Update by Sudhir Chaudhary:
India-US Trade Tension
भारताने मागील काही महिन्यामध्ये रशियाकडून स्वस्त दारात तेल खरेदी केली होती, पण संपूर्ण यूरोप सह अमेरिकेचा याला विरोध होता. परंतु भारताने राष्ट्र प्रथम या माध्यमातून स्व हितासाठी ही खरेदी सुरूच ठेवली होती. याच कारणामुळे अमेरिका यावर टॅरिफ लावून भारताला शिक्षा देण्याची त्यांची भूमिका घेणार आहे.
अंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे ‘भारताने युक्रेनला सपोर्ट करावा अशी अमेरिकेची भूमिका आहे, पण भारताच्या महत्वाचे धोरणात राष्ट्र प्रथम म्हणजे हे आमच्या राष्ट्राचं हीत आहे आणि ते आम्ही जोपासणारच अशी भारताची भूमिका आहे. यामुळेच ट्रम्प यांनी India-US Trade Tension माध्यमातून दबाव निर्माण केल्याचा प्रयत्न असावा, काही कालांतराने अमेरिका घेतलेला निर्णय मागे घेईल’ असं मत तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
देश-विदेशातील ताज्या बातम्यांसाठी लोकबातमी पोर्टल ला दररोज भेट द्या…










