शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी यंत्र वाटप यादी जाहीर 2025, तुमचं नाव तपासा! MahaDBT Lottery 2025

Date:

MahaDBT Lottery 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, MahaDBT कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत 2025 साठी जाहीर झाली आहे, ट्रॅक्टर व अन्य यंत्रांसाठी अनुदान यादीत आपले नाव जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या MahaDBT पोर्टलवरून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी 2025 मधील महत्वाची बातमी आहे. कृषी विभागाच्या “कृषी यांत्रिकीकरण योजना 2025” अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत शासनाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या योजना द्वारे ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, पॉवर टिल्लर, नांगर, कडबा कटर यांसारख्या विविध यंत्रांसाठी सरकार अनुदान देणार आहे.

MahaDBT Lottery 2025 ऑनलाईन सोडत प्रक्रिया

महाराष्ट्र शासन हे कृषी यांत्रिकीकरण योजने साठी महाडीबीटी पोर्टलद्वारे वाटप प्रक्रिया करते जी संपूर्णतः संगणकीय पद्धत असते. त्यामुळे यामधील अर्जदारांची निवड अत्यंत पारदर्शकतेने होते. यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असून शेजाऱ्यांनी पुढील आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे MahaDBT पोर्टलवर अपलोड करावीत:

  • 7/12 उतारा
  • होल्डिंग प्रमाणपत्र
  • निवडलेल्या यंत्राचे कोटेशन
  • टेस्ट रिपोर्ट (लागू असल्यास आवश्यक)
  • ट्रॅक्टर आरसी बुक (जर पहिले ट्रॅक्टर असले तरच)

Note: जर ट्रॅक्टर तुमच्या नावावर नसेल, तर कुटुंबातील सदस्य (आई, वडील, अविवाहित मुले) यांच्या नावावर असणे आवश्यक आहे

शतकऱ्यानी सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर अर्जाची पूणर आवृत्ती म्हणजेच pre-approval दिली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यास लागू अनुदान मंजूर होते. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात जमा केलं जातं. त्यानंतर त्यांना संबंधित यंत्र विक्रेत्याकडून खरेदी करता येते.

जिल्हानिहाय यादी पाहा

या सोडतीत निवड झालेली यादी शेतकऱ्यांची यादी महाडीबीटी पोर्टलवर जिल्हानिहाय पद्धतीने उपलब्ध केली जाते. यात तुम्ही अर्ज क्रमांक किंवा जिल्ह्यानुसार यादी तपासू शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइट पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in ला अवश्य भेट द्या.

या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी अर्जाची स्तिथी वेळेत पाहा आणि नाव आल्यास योग्य या अचूक कागतपत्रे सादर करून योजनेचा लॅब घ्या. जर तुम्हला आणखी शंका असल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री मिळवण्यास आर्थिक मदत करते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची सोडतीत निवड झाली आहे, त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी.

महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील योजना आणि अपडेटसाठी दररोज लोकबातमी पोर्टल ला भेट देत राहा….

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile