गिरीश महाजनांच खडसेंना थेट आव्हान: “माझी नार्को टेस्ट करा, घाबरत नाही!” Girish Mahajan Vs Eknath Khadse

Date:

Girish Mahajan Vs Eknath Khadse: पुण्याच्या खराडी घडलेल्या हायप्रोफाईल रेव्ह-पार्टी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी धक्कादायाक बाब उघडीस अली आहे. राष्ट्रवादी शरद पावार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर Pune Rave Party अटकेत आल्याने राजकीय वाद तीव्र झालेला माध्यमांद्वारे दिसून येत आहे. यावर आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट खडसेंवर जोरदार टीका करत त्यांचे आव्हान स्वीकारले आहे, “नार्को टेस्ट हवी? माझीही करा!”

महाजनांचा खडसेंना टोला

गिरीश महाजन आज मीडिया सोबत बोलत असताना म्हणाले, “एकनाथ खडसेंना आता समजलं असेल की त्यांचे जावई नेमके काय करत होते. कायम आमच्या विरोधात राहणाऱ्यांनी आता स्वतःकडे बघायला हवं.” त्यांनी असे मिश्किल भाषेत खडसेंना टोला लगावत म्हटलं की, “खरंच आहे, खडसे कोणतीही गोष्ट सहनच करत नाहीत.”

खडसेंचे नार्को टेस्टचं आव्हान

गिरीश महाजन पुढे म्हणाले, “खडसेंनी नार्को टेस्टचीच मागणी केली आहे ना? मग माझी आणि सोबतच लोढांचीही करा! मी ह्यासाठी तयार आहे. यांचं खोटं बोलणं थांबवण्यासाठी ही तपासणी आवश्यक असेल तर ती देखील मी करायला तयार आहे.” पुण्यातील घडलेल्या या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडे कोकेन, गांजा, हुक्का अश्या अमली पदार्थांचे पुरावे असल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

संपत्तीची चौकशी Girish Mahajan Vs Eknath Khadse

Girish Mahajan यांनी आणखी एक प्रमुख मुद्दा उपस्थित करत खडसेंना डिवचले, “तुम्ही माझी संपत्ती काढा, ऑनलाईन आजकाल सगळं मिळतं. मी तुम्हाला सर्व काही कागदपत्रे देतो. याची दहा वेळा चौकशी करा. पण हे लक्षात राहूद्या खडसेंच्या संपत्तीची चौकशी झाल्यावर काय झालं हे सगळ्यांना ठाऊक आहे. मी तो विषय केव्हाच सोडून दिला आहे.”

Pune Rave Party राजकीय संघर्ष तीव्र

Pune Rave Party: एकनाथ खडसेंचे चक्क जावई रेव्ह पार्टीप्रकरनात असल्याने विरोधकांवर टीका करणारे खडसे यांना आता स्वतःवरच टिकेचा सामना करावा लागत आहे. गिरीश महाजन आणि खडसे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, जळगावच्या राजकारणात नेमकी काय होणार, हे पाहणं आता सर्वांचं निर्णायक वाटत आहे.

महाराष्ट्र राजकारणातील ताज्या बातम्यांसाठी लोकबातमी ला दररोज भेट देत राहा…

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile