जलसंधारण विभागात 8667 पदे मंजूर! संजय राठोड यांची विधान परिषदेत मोठी घोषणा Soil and Water Conservation Vacancies

Date:

Soil and Water Conservation Vacancies: महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण विभागात तब्बल 8667 रिक्त पदांची भरती लवकरच करणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी 14 जुलै रोजी विधान परिषदेत दिली आहे. ही भरती उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेनंतर आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

1992 मधील तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी मृद व जलसंधारण विभागाची संकल्पना व प्रस्ताव मांडली होता पण याला 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात वेग मिळाला आणि विभागाला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. त्यावेळी या विभागामध्ये ऐकून 16,423 पदांचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे सर्व पदे विभागाला मिळाली नव्हती.

जलसंधारण विभागात 8667 पदे मंजूर, नव्याने तयार झाला आकृतीबंध

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नव्याने तयार झाला आकृतीबंधवर भाष्य केले त्यात ते असे म्हणाले, राज्यातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला, या मार्फत Maharashtra Government Jobs आता 8667 पदांचा समावेश करण्यात आला. या मधील अनावश्यक पदे वगळण्यात आली असून, उर्वरित पदांना उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

विभागाची कार्यक्षमता वाढणार

राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, या भरतीमुळे विभागाची कार्यक्षमता वाढेलाच सोबत जलसंधारण विभागातील विविध कामांना आणखी गती मिळेल आणि सिंचन वेवस्था आणखी मजबूत बनेल. परिणामी, राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.

14 जुलै रोजी अधिवेशनात त्यांनी सांगितले की, विभागातील अनेक योजना विविध कारणांमुळे रखडल्या होत्या यातील काही प्रकरणात लोकांचा विरोध होता तर काही योजना वनजमिनीशी संबंधित होत्या आणि काहींना प्रशासकीय मंजुरी मिळूनही आत्तापार्येंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अशा सर्व योजनांचा सखोल आढावा घेऊन गरजेच्या योजनांना पुनरावलोकनाच्या आधारे पुढे नेण्याचा निर्णय या मार्फत घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय भरती व महत्त्वाच्या घडामोडींसाठी लोकबातमी ला दररोज भेट द्या…

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

Visit: Soil and Water Conservation Department Maharashtra Government Jobs

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile