CM Fadnavis On Mumbai Central Station: मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकाच्या नावात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी सध्या जोर धरत असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अधिवेशनात सविस्तर माहिती दिली आहे.
विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दोन प्रमुख मुद्दे उपस्थित केले. यामध्ये पहिला पहिला मुद्दा विचारताना ते म्हणाले सीएसटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा का नाही? आणि दुसरा दुसरा मुद्दा म्हणजे मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलून ‘जगन्नाथ नाना शंकरशेठ’ करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
Devendra Fadnavis On Mumbai Central Station: या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ जुलै रोजी उत्तर देताना विधानसभेत भाष्य केलं आहे, ते म्हणाले, “सीएसटी स्थानकाचा भव्य पुनर्विकास सध्या सुरू असून त्या आराखड्याच्याच भागात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वेगळा प्रस्ताव करायची गरज वाटत नाही.”
मुंबई सेंट्रल स्टेशनच्या नावाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis या प्रश्नावर वर बोलताना म्हणाले, “जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचा मुंबईच्या विकासात आणि जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. रेल्वेपासून ते इतर मुंबईतील प्रमुख कामांमध्ये त्यांचे योगदान अग्रणी आहे. त्यामुळे मागील काळात, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यावेळी मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे सादर केला आहे. तो प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे आणि त्याचा पाठपुरावा लवकरच केला जाईल.” असं देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सांगितलं आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार?
Mumbai Central name change: मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव ‘जगन्नाथ नाना शंकरशेठ’ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सांगितलं आहे. त्यामुळे आता हे नाव बदलण्याची चर्चा सध्या वेग घेत आहे.
Jagannath Nana Shankarsheth यांचे ममुंबईतील सामाजिक विकासात मोलाचं योगदान आहे, ते मुंबईत रेल्वे प्रकल्प आणण्यामध्ये अग्रणी होते. त्यांनी याचप्रमाणे शाळा, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक उपक्रम मुंबईत सुरु केले. नाना शंकरशेठ हे भारतीय इतिहासातील पहिले लोकहितवादी म्हणून ओळखले जाणारे वक्तिमत्व आहे आणि त्यांचं नाव मुंबईच्या जडणघडणीत अढळ स्थान राखून आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी लोकबातमी ला नेहमी भेट द्या…










