केवळ नशिबावर नाही! तर ‘या’ 6 कारणांमुळे मुले परीक्षेत नापास होतात Tips to avoid exam failure

Updated On:

Tips to avoid exam failure: परीक्षेच्या अपयशामागे नुसतं नशीब दोषी नसते तर अनेक वेळा काही छोट्या-छोट्या चुका विद्यार्थ्यांच्या यशाच्या मार्गात अडथळा आणत असतात. योग्य वेळी त्या चुका ओळखून सुधारणा केल्यास पुन्हा यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. आज या पोस्ट च्या माध्यमातून आपण परीक्षेत नापास होण्यामागे नशीब नाही तर ‘ही’ 6 महत्वाची कारणे पाहणार आहोत ज्याने तुम्हाला लवकरात लवकर यशपर्येंत पोहोचता येईल.

6 Exam failure reasons tips in Marathi

1. फक्त ट्यूशनवर अवलंबून राहणं, गृहपाठाचे महत्त्व विसरू नका!

सध्या ट्यूशन एक ट्रेंडच झाला आहे, महत्वचे म्हणजे पालक सुद्धा यामध्ये आपल्या मुलाला फोर्स करतात. बरेच विद्यार्थी सध्या ट्यूशनला जातात आणि घरचा अभ्यास सोडून देतात. पण लक्षात असूद्या केवळ ट्यूशनमुळे यश मिळेलच ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतः अभ्यास केल्याशिवाय विषय पूर्ण समजत नाही. ट्यूशन ही केवळ मार्गदर्शनासाठी असते, पण मेहनत स्वतःलाच करावी लागते. जर आपण जास्त भर घरच्या अभयसावर दिला ला त्याचा फायदा सर्वात अधिक होऊ शकतो.

2. बेसिक संकल्पना न समजणे

पाया पक्का नसेल, तर इमारत कोसळते! वर्षाच्या सुरुवातीला अभ्यास न करणे किंवा पुढे करू असे समजून तोच अभ्यास परीक्षा जवळ आल्या की डोकेदुखी ठरतात. पायाभूत ज्ञान स्पष्ट नसेल, तर पुढील अभ्यास देखील समजत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टी संकल्पना वेळेत समजून घेणे आवश्यक आहे.

3. प्रश्न न विचारणं म्हणजे संधी गमावणं

शिक्षकांसोबत बोलण्यामध्ये भीती वाटणे किंवा संकोचाकरणे त्यामुळे त्यांच्या मनातील शंका कायम राहतात. शिक्षकांसोबत संवाद साधणं आणि संकल्पना सोडवणं हेच यशाकडे जाण्याचं पाऊल आहे. म्हणून प्रश्न विचारात जा मनातील संभ्रम वेळेत काडून टाका.

4. मित्रांचे नोट्स वापरणे

मित्रांच्या नोट्स वापरणं सर्वात सोप वाटतं, पण प्रत्येकाच्या समजण्याची पद्धत आणि नोट्स च्या माध्यमातून लिहण्याची पद्धत वेगळी असते. स्वतःचं नोट्स तयार केल्यास अभ्यास अधिक मजबूत होतो आणि परीक्षा दरम्यान वेळही वाचतो.

5. ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन वर भर देणे

सध्या सर्वच विद्यार्थी अभ्यासासाठी ऑनलाईन व्हिडिओज, अ‍ॅप्स आणि डिजिटल नोट्सवर अवलंबून झालेले दिसतात. पण यामुळे अनेकदा लक्ष विचलित होतं आणि आपण वेळाच गोष्टी पाहत राहतो. पण लक्ष्यात राहूद्या जी आपली संस्कृती आहे ट्रॅडिशनल पद्द्धत (ऑफलाईन) याच पद्धतीने अभ्यास करा जसे पुस्तक वाचन, स्वतःचे नोट्स स्वतः बनवणं, शिक्षकांसोबत थेट संवाद साधने या गोष्टी विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी व स्मरणशक्तीसाठी अधिक फायदेशीर आहेत. (Exam failure reasons tips in marathi) त्यामुळे ऑनलाईन कमी किंवा नाहीच पण ऑफलाईन वर वर भर द्या.

6. कुटुंबाकडून मानसिक दडपण

सध्या जवळपास बहुतांश पालकच मुलांवर अनावश्यक दबाव टाकतात – शेजारचा मुलगा परीक्षेत पहिला आला”, भावंडापेक्षा तुला गन कमी? अशा तुलनांनी मुलांचा आत्मविश्वासावर परिणाम होतो. घरच्यांनी अपेक्षा ठेवाव्यात, पण त्या प्रेरणादायक असाव्यात, दबाव टाकणाऱ्या नाहीत. मुलांचं मन समजून घ्या आणि त्याला कोणत्या गोष्टी करण्या आनंद वाटतो तो समजून त्याचे योग्य मार्गदर्शन करा म्हणजे यश लवकर मिळेल.

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

Exam failure reasons tips in Marathi: विद्यार्थ्यांच्या अपयशाचं प्रमुख कारण या वरील 6 कारणांमुळेच होत असता हे योग्य वेळेत शोधणं आणि ते वेळेत दुरुस्त करणं हेच यशाचा जवळचा मार्ग आहे. नुसती मेहनत नाही, तर योग्य पद्धतीने केलेला अभ्यासच हाच यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो. म्हणूनच, वरील चुका पहिले ओळखा आणि त्यावर काम करा. तुमचं यश निश्चित आहे!

करिअरविषयक उपयुक्त माहितीसाठी लोकबातमी ला नियमितपणे भेट द्या

Source: Youtube Lat’stute Marathi

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile